डॉ. गोपी सोरडे यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:21 AM2021-06-16T04:21:34+5:302021-06-16T04:21:34+5:30
जि.प.ची वाट बिकट जळगाव : जिल्हा पिरषदेच्या जुन्या इमारतीकडे जाणारा रस्ता कामामुळे खोदण्यात आला असून या खड्ड्यात पाणी साचल्याने ...
जि.प.ची वाट बिकट
जळगाव : जिल्हा पिरषदेच्या जुन्या इमारतीकडे जाणारा रस्ता कामामुळे खोदण्यात आला असून या खड्ड्यात पाणी साचल्याने शिवाय हा रस्ता अत्यंत अरूंद झाल्याने या ठिकाणी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. मंगळवारी तर पावसामुळे अधिकच हाल झाले होते. शिवाय नवीन व जुन्या इमारतीच्या समोर नाला वाहत असल्याने कर्मचाऱ्यांना नव्या इमारतीत जाणेही कठीण झाले होते.
यशस्वी शस्त्रक्रिया
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात म्युकरमायकोसिस च्या गुंतागुंतीची अवघड शस्त्रक्रिया मंगळवार १५ जून रोजी पार पडली. या शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाचा जीव वाचविण्यात वैद्यकीय पथकाला पाच तासांनंतर यश आले.
चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथील ६३ वर्षीय इसमाला म्युकरमायकोसिस आजाराची लक्षणे दिसून येत होती. त्याच वेळी त्याला जेवण करण्यास अडचणी येत होत्या. रुग्णाची यापूर्वी हृदय शस्त्रक्रिया झालेली आहे. अशा अतिगंभीर परिस्थितीत त्याला १० जून मे रोजी जीएमसीत दाखल करण्यात आले होते.