डॉ.शांताराम पाटील यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 01:19 AM2019-11-02T01:19:37+5:302019-11-02T01:19:54+5:30
मुख्याध्यापक डॉ.शांताराम दाजीबा पाटील यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पारोळा, जि.जळगाव : न्यू पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मोंढाळे पिंप्री संचलित आदर्श विद्यालय, पारोळा येथील मुख्याध्यापक डॉ.शांताराम दाजीबा पाटील यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सोलापूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या ७५व्या अधिवेशनामध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी सांगलीचे संभाजी पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड, सचिव आदिनाथ थोरात, उपाध्यक्ष जे.के.पाटील, व्ही.जी.पोवार, हरिश्चंद्र गायकवाड आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, गौरवपत्र, सन्मान चिन्ह या पुरस्कारात देण्यात आले. अधिवेशनास राज्यातील मुख्याध्यापक उपस्थित होते.
डॉ.शांताराम पाटील यांना पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल ग.स. सोसायटीचे माजी अध्यक्ष तुकाराम बोरोले, अरुण पवार, डॉ.निकम, बी.झेड.पाटील, अशोक पाटील, जिल्हा मुख्याध्यापक संघ, पारोळा तालुका मुख्याध्यापक संघ, पारोळा तालुका माध्यमिक व प्राथमिक शिक्षक संघ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे
न्यू पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या प्राचार्या वर्षा पाटील, व शिक्षकवृंदांनी आनंद व्यक्त केला आहे.