पाचोरा तालुक्यातील वरखेडी सरपंचपदी डॉ.सरला चौधरी बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 03:46 PM2019-03-18T15:46:01+5:302019-03-18T16:14:01+5:30

वरखेडी येथील सरपंचपदी डॉ.सरला जितेंद्र चौधरी यांची सोमवारी झालेल्या सभेत बिनविरोध निवड करण्यात आली.

Dr. Surala Chaudhary elected unopposed warkhede sarpanch in Pachora taluka | पाचोरा तालुक्यातील वरखेडी सरपंचपदी डॉ.सरला चौधरी बिनविरोध

पाचोरा तालुक्यातील वरखेडी सरपंचपदी डॉ.सरला चौधरी बिनविरोध

Next
ठळक मुद्देडॉ.सरला चौधरी स्वीकारणार दुसऱ्यांदा सूत्रेएकमेव अर्ज आल्याने झाली निवड बिनविरोधसरपंचपदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी पद आरक्षित





 
वरखेडी, ता.पाचोरा, जि.जळगाव : येथील सरपंचपदी डॉ.सरला जितेंद्र चौधरी यांची सोमवारी झालेल्या सभेत बिनविरोध निवड करण्यात आली.
मावळत्या सरपंच सीमा धनराज पाटील यांनी ठरल्यानुसार एक वर्षाच्या कार्यकाळानंतर सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. ११ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी हे पद आरक्षित आहे.
सरपंच पद रिक्त असल्याने १२ फेब्रुवारी २०१९ च्या मासिक सभेत प्रभारी सरपंच म्हणून संतोष दौलत पाटील यांच्याकडे सूत्रे सोपविण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित काळासाठी १८ मार्च रोजी डॉ.सरला जितेंद्र चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
डॉ.सरला चौधरी या दुसऱ्यांदा सरपंचपदी विराजमान होत असून, याआधीदेखील २००८ मध्ये त्यांना सरपंचपदाचा बहुमान मिळाला होता.
यावेळी अध्यासी अधिकारी तथा मंडळ अधिकारी भाग वरखेडीचे वरद विठ्ठल वाडेकर हे होते. सरपंचपदासाठी डॉ.सरला जितेंद्र चौधरी यांचे एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्या सीमा धनराज पाटील, लता गजानन पाटील, उषा ज्ञानेश्वर सोनार, मंगला नाना पाटील, कलाबाई श्रावण भोई तर ग्रामपंचायत सदस्य संतोष दौलत पाटील, सागर दिलीप धनराळे, कुंदन ईश्वरलाल चौधरी, दीपक शिवाजी बागुल, जगदीश पंढरीनाथ चौधरी हे उपस्थित होते.
निवडणूक कामी ग्रामविकास अधिकारी विजय पाटील तथा ग्रामपंचायतीचे लिपीक शेनफडू बोरसे यांनी मदत केली. यावेळी गजानन पाटील, धनराज पाटील, ज्ञानेश्वर सोनार, विजय भोई, राकेश पाटील, डॉ.जितेंद्र चौधरी, प्रकाश चौधरी, भोकरी गावच्या सरपंच सलमाबी रशीद काकर, भोकरी ग्रा.पं.सदस्य रशिद शब्बीर काकर, दिलीप चौधरी, गणेश पाटील, चंदू पाटील, भानुदास पाटील, पंकज पाटील आसिफ काकर, जमील पठाण, दुगार्दास सोनार आदी उपस्थित होते. पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक शिवनारायण देशमुख, हवालदार उत्तम बावस्कर यांनी बंदोबस्त ठेवला.

Web Title: Dr. Surala Chaudhary elected unopposed warkhede sarpanch in Pachora taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.