डॉ. उल्हास पाटील हेच खरे पालनकर्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:17 AM2021-02-24T04:17:49+5:302021-02-24T04:17:49+5:30
जळगाव : डॉ. उल्हास पाटील यांचे कार्य एका दीपस्तंभाप्रमाणे आहे. त्यांचे अपार कष्ट हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. लाख मेले ...
जळगाव : डॉ. उल्हास पाटील यांचे कार्य एका दीपस्तंभाप्रमाणे आहे. त्यांचे अपार कष्ट हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. लाख मेले तरी चालतील पण लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे या उक्तीप्रमाणे डॉ. उल्हास पाटील हेच खरे पालनकर्ता असल्याच्या शुभेच्छारूपी भावना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांसह मान्यवरांनी व्यक्त केल्या.
गोदावरी फाउडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांचा ६१ वा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला. आई गोदावरी पाटील, गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, संचालिका डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, नात किवा पाटील, अधिष्ठाता डॉ. एन.एस. आर्वीकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, माया आर्वीकर, डॉ. चंद्रय्या कांते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. उल्हास पाटील यांच्याहस्ते केक कापण्यात आला. मान्यवरांसह डॉ. मिलिंद जोशी, डॉ. शिवाजी सादुलवाड, डॉ. नेहा महाजन, डॉ. ऋतुराज काकड, अशोक भिडे, डॉ. तळेले, प्रा. विठ्ठल शिंदे, डॉ. महेश चौधरी, प्रा. बिटे, डॉ. प्रदीप देवकाते, डॉ. कैलास वाघ आदींनी शुभेच्छारूपी भावना व्यक्त केल्या. डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ, सावदा, जळगाव तसेच गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, गोदावरी आयएमआर महाविद्यालय, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालय, कृषी महाविद्यालय इत्यादी ठिकाणी केक कापण्यात आला. खासदार म्हणून जिल्ह्याची सेवा घडो अशा शुभेच्छा खासदार राहुल गांधी यांच्या टिम मधील सहकारी योगेंद्रसिंग पाटील यांच्यासह समर्थकांनी डॉ. उल्हास पाटील यांना शुभेच्छा दिल्या.