‘आयएमए’च्या अध्यक्षपदी डॉ.विश्वेश अग्रवाल तर सचिवपदी डॉ.राजेश पाटील बिनविरोध
By admin | Published: March 30, 2017 12:25 PM2017-03-30T12:25:34+5:302017-03-30T12:25:34+5:30
आयएमएच्या जळगाव शाखेच्या अध्यक्षपदी डॉ.विश्वेश अग्रवाल तर सचिवपदी डॉ.राजेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
Next
जळगाव,दि.30- इंडियन मेडिकल असोसिएशनची (आयएमए) निवडणूक बिनविरोध होऊन अध्यक्षपदी डॉ.विश्वेश अग्रवाल यांची तर सचिवपदी डॉ.राजेश पाटील यांची निवड करण्यात आली. आयएमएच्या या दोन्ही महत्त्वाच्या पदांवर एकाच वेळी दोन्ही पदाधिकारी बालरोग तज्ज्ञ असल्याची पहिलीच घटना आहे.
नूतन कार्यकारिणीच्या निवडीसाठी 13 जागांसाठी जवळपास 50 डॉक्टरांनी अर्ज दाखल केले होते. मात्र नंतर अर्ज मागे घेण्यात आल्याने निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ.चंद्रशेखर सिकची व डॉ.सी.जी.चौधरी यांनी काम पाहिले.
अध्यक्षपदी निवड झालेले डॉ.विश्वेश अग्रवाल हे यापूर्वी आयएमएचे उपाध्यक्ष होते तर सचिवपदी निवड झालेले डॉ.राजेश पाटील सहसचिव होते.
नूतन कार्यकारिणी या प्रमाणे- उपाध्यक्ष डॉ.किरण मुठे, कोषाध्यक्ष- डॉ.तुषार बेंडाळे, सहकोषाध्यक्ष डॉ.पंकज शहा, सहसचिव डॉ.स्नेहल फेगडे, डॉ.राधेश्याम चौधरी, जनसंपर्क अधिकारी डॉ.जितेंद्र कोल्हे, सहजनसंपर्क अधिकारी डॉ.दिलीप महाजन, कार्यकारिणी सदस्य- डॉ.मनिषा दमानी, डॉ.तिलोत्तमा गाजरे, डॉ.भरत बोरोले, डॉ.प्रशांत देशमुख, डॉ.सुशील राणे, डॉ.विकास बोरोले यांची निवड करण्यात आली.
अध्यक्ष, सचिवांचा कार्यकाळ एक वर्षाचा
नूतन कार्यकारिणीचा कार्यकाळ तीन वर्षाचा असून राज्यातील इतर आयएमएच्या शाखांप्रमाणे अध्यक्ष व सचिवांचा कार्यकाळ एक वर्षाचा करून नवीन नेतृत्वाला संधी देण्याचा स्वागतार्ह निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.