‘त्या’ अजगराला सोडले जंगलात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 10:54 PM2020-10-13T22:54:25+5:302020-10-13T22:54:31+5:30
सावखेडा परिसर : आढळला होता युरियाच्या बंद थैलीत
सावखेडा, ता. रावेर: सावखेडा कुंभारखेडा रस्त्यावर आढळलेल्या अजगरास सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आले आहे.
रात्रीच्या अंधारात अज्ञात दोघा व्यक्तींना १० रोजी दहा वाजेच्या सुमारास बिनविषारी अजगर बांधलेल्या एका थैलीत रस्त्याच्या बाजूला शेतात आढळला होता.
घटनेची माहिती मिळताच हा अजगर ताब्यात घेत ११ रोजी वनरक्षक नीलम परदेशी, सावखेडा येथील वन्यजीवप्रेमी चेतन चौधरी, गोपाळ पाटील व नीरज नंदाने यांनी त्यास जंगलात सुखरूप सोडले.
या घटनेच्या पाच ते सहा दिवस अगोदर या शिवाराच्या जवळच गौरखेडा शिवारात ज्वारीच्या शेतात १२ फूट लांबीचा अजगर आढळून आला होता.
यामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ यांच्यामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. तर सावखेडा परिसरात अजगराला युरियाच्या थैलीमध्ये कोंबून त्याचा वापर तस्करीसाठी तर केला जाणार नव्हता ना? असे प्रश्न उपस्थित होत आहे.
याबाबत वनअधिकारी यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.