अमळनेर तालुक्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तापीचे वाहून जाणारे पाणी नदी-नाल्यात टाकावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 11:58 AM2018-02-24T11:58:03+5:302018-02-24T11:58:03+5:30

नव्या संकल्पनेसाठी तालुक्यात जनजागृती सुरू

Drainage water should be drained in river-drain | अमळनेर तालुक्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तापीचे वाहून जाणारे पाणी नदी-नाल्यात टाकावे

अमळनेर तालुक्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तापीचे वाहून जाणारे पाणी नदी-नाल्यात टाकावे

Next
ठळक मुद्देपाणी टंचाई कायमस्वरुपी दूर होण्यास मदत होणार

चुडामण बोरसे / आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २४ - अमळनेर तालुक्यातील पाणी प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी तापी नदीवरुन वाहून जाणारे पावसाचे पाणी प्रत्येक नाल्याच्या सुरुवातीच्या भागामध्ये उपसा सिंचनाद्वारे टाकून सर्व नदी- नाले पावसाच्या पाण्याने रिचार्ज करावेत, अशी संकल्पना पुढे येत आहे. यासाठी गडखांब ता. अमळनेर येथील जय किसान शेतकरी मंडळाचे अध्यक्ष रमेश व्यंकट पाटील यांनी जनजागृती सुरु केली आहे़
हा नवा प्रकल्प झाल्यास तालुक्यात दरवर्षी येणाºया दुष्काळाची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे एवढेच नाही तर तालुक्याचा पिण्याचा व शेतीचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे. अमळनेर हा कायमस्वरुपी अवर्षण प्रवण आणि पर्जन्यछायेत असणारा तालुका आहे. गेल्या वर्षी पावसाळा अत्यल्प झालेला आहे. अमळनेर तालुक्याला नेहमीच दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. तापी नदी अमळनेर तालुक्यातून वाहत असली तरी ती फक्त जुलै ते जानेवारी या दरम्यान वाहत असते.
काय आहे योजना
तालुक्याचा दुष्काळ आणि पाणी प्रश्न कायम सोडविण्यासाठी तापी नदीवरुन निम्न बंधाºयातून नियोजित उपसा सिंचन योजना तयार करण्यात याव्यात, तापी नदीचे पाणी तालुक्यातील प्रत्येक नाल्याच्या सुरुवातीला पुनर्भरणासाठी टाकले तर तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटू शकेल. अमळनेर तालुक्यातील तापी नदी ते सूरत रेल्वे मार्ग एवढे ४० टक्के क्षेत्र मंजूर व अस्तित्वात असलेल्या उपसा सिंचन योजनांमध्ये समावेश केल्यास हे सर्व शक्य असल्याची माहिती पाटील यांनी दिली़
या शिवारातील नदी नाल्यावर तापी नदीवरुन उपसा सिंचनाद्वारे जुलै ते जानेवारी महिन्यापर्यंत सात महिने पावसाचे पाणी टाकल्यास पाणी टंचाई कायमस्वरुपी दूर होण्यास मदत होणार आहे.
राज्यात उपसा सिंचन योजनांना सध्या भरमसाठ वीजबिलांच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. चांगल्या योजनांना यामुळे खीळ बसत आहे. तसे होऊ नये, म्हणून सौर उर्जा व वीज अशा हायब्रीङ पद्धतीने वीज बिलाची समस्या सोडविता येईल. या विषयावर ग्रामसभा घेऊन लोकांना याचे महत्व पटावे, यासाठी लोकचळवळ उभी करण्याचा मानस आहे.
- रमेश पाटील, अध्यक्ष, जयकिसान शेतकरी मंडळ, गडखांब, अमळनेर.

Web Title: Drainage water should be drained in river-drain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.