जळगावातील बंदीस्त नाट्यगृहाचे ९० टक्के काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:34 PM2018-03-25T12:34:22+5:302018-03-25T12:34:22+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी केली अचानक पाहणी
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २५ - महाबळ रस्त्यावर उभारण्यात येत असलेल्या बंदीस्त नाट्यगृहाची शनिवारी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी अचानक भेट देऊन तेथे सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. दरम्यान, नाट्यगृहाचे ९० टक्के काम झाले असून किरकोळ काम बाकी असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.
या बंदीस्त नाट्यगृहाचा नववर्षाच्या मुहूर्तावर शुभारंभ होईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले होते. मात्र नाट्यगृहाचे काम पूर्ण न झाल्याने हा मुहूर्त टळला होता.
त्यानंतर शनिवारी जिल्हाधिकारी निंबाळकर अचानक नाट्यगृहात पोहचले. या वेळी त्यांच्यासोबत जैन उद्योग समुहाचे सह व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, माजी महापौर नितीन लढ्ढा, नगरसेवक अमर जैन आदी उपस्थित होते.
या वेळी त्यांनी नाट्यगृहाचा आतील भाग, समोरील रस्ता तसेच येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.
येथे अजूनही येथील पडदे, खुर्च्यांचे किरकोळ काम, एसीची तपासणी (ट्रायल)बाकी आहे.
दरम्यान, ३० रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावात येत असले तरी नाट्य गृहाचे काम बाकी असल्याने त्या दिवशी उद््घाटन शक्य नाही.