जळगावातील बंदीस्त नाटय़गृहाच्या पूर्णत्वाचा ‘31 डिसेंबर’चा मुहूर्त टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 11:35 AM2017-12-31T11:35:36+5:302017-12-31T11:39:00+5:30
सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या आदेशानंतरही काम अपूर्णच
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 31- 31 डिसेंबर्पयत बंदिस्त नाटय़गृहाचे काम पूर्ण करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 4 डिसेंबर रोजी दिले होते. मात्र 31 डिसेंबर उजाडले तरी येथील रंगमंच, बैठक व्यवस्था, प्रकाश योजना आदी कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे कामाच्या पूर्ततेचा 31 डिसेंबरचा मुहूर्त टळला आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्याहस्ते नाटय़गृहाचे उद्घाटन करून शहरवासीयांना ही नववर्षाची भेट दिली जाईल, असे सुतोवाच पालकमंत्र्यांनी केले होते. त्यानंतर 4 डिसेंबर रोजी पुन्हा पालकमंत्र्यांनी नाटय़गृहास भेट देऊन हे काम 31 डिसेंबर्पयत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. या पाश्र्वभूमीवर नाटय़गृहाची प्रत्यक्ष पाहणी केली असता अद्यापही येथे 10 ते 15 टक्के काम अपूर्णच आहे.
रंगमंचाचे काम अपूर्ण
नाटय़गृहाचा महत्त्वाचा भाग असलेल्या रंगमंचाचेच काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या ठिकाणी शनिवार, 30 डिसेंबर रोजी पाहणी केली असता रंगमंचाच्या आजूबाजूला मागे प्लायवूड लावण्याचे काम सुरू होते. यास किमान तीन ते चार दिवस लागणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर रंगमंचाचे इतर काम पूर्ण होईल.
बैठक व्यवस्थाही नाही
बैठक व्यवस्थेसाठी खुच्र्याचेही काम पूर्ण झालेले नाही. या ठिकाणी प्लायवूड शीटवर मार्किंग करणे शनिवारी सुरू होते. हे मार्किंग झाल्यानंतर खुच्र्या तयार होतील व त्या बसविल्या जातील.
इलेक्ट्रीक फिटिंग बाकी
इलेक्ट्रिक कामही अद्याप मार्गी लागलेले नाही. प्रकाश योजना, एसी यांचे काम बाकी आहे. नाटय़गृहात छतावर यासाठी जागा सोडल्याचे व उघडय़ा वायर दिसून येत आहे. या सोबतच लिफ्टचेही काम झालेले नाही.
सिव्हीलवर्क व इलेक्ट्रिकल वर्क एकापाठोपाठ आहे. सिव्हीलवर्क पूर्ण होत आले असून इलेक्ट्रिक वर्क बाकी असल्याने त्यानंतरच उर्वरित सिव्हील वर्क होणार असल्याचे अधिका:यांचे म्हणणे आहे.
एकूणच एवढे कामे बाकी असल्याने 31 डिसेंबर्पयत काम होत नसल्याचे चित्र असून पालकमंत्र्यांच्या आदेशाला खो दिला जात असल्याच ेबोलले जात आहे.
सिव्हीलवर्क जवळपास पूर्ण झाले असून इलेक्ट्रिक वर्क बाकी आहे. ते झाल्यानंतर उर्वरित सिव्हील वर्क होईल. इलेक्ट्रीक काम झाल्यानंतर सिव्हीलचे केवळ आठ दिवसांचे काम राहणार आहे.
- प्रशांत सोनवणे, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग