‘डॉक्टर जरा समजून घ्या’ नाटकात श्रोते मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 09:36 PM2018-08-20T21:36:28+5:302018-08-20T21:37:58+5:30

चाळीसगावात रंगला अनोखा नाट्यप्रयोग

In the drama 'Learn the doctor,' the audience mesmerized | ‘डॉक्टर जरा समजून घ्या’ नाटकात श्रोते मंत्रमुग्ध

‘डॉक्टर जरा समजून घ्या’ नाटकात श्रोते मंत्रमुग्ध

Next


चाळीसगाव, जि.जळगाव : एकेकाळी डॉक्टर हा अनेक जणांच्या कुटुंबातला एक सन्माननीय सभासद असायचा. आता मात्र डॉक्टरांकडे सारखे संशयाने पाहिले जाते. जरा काही कुठे बिघडले तर डॉक्टरांना जबादार धरणे, फोडतोड करणे, मारामारी करणे अशा घटना वारंवार घडायला लागल्या आहेत. असं का घडलं? याचा विचार करून महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे यांनी विवेक बेळे लिखित अभय गोडसे दिग्दर्शित ‘जरा समजून घ्या’ हे नाटक रंगमंचावर आणले आहे. चाळीसगावला या नाटकाचा प्रयोग (प्रयोग क्रमांक २७) रंगगंध कलासक्त न्यासच्या रसिक प्रेक्षक सभासद योजनेत पूर्ण भरलेल्या प्रेक्षागृहात नुकताच सादर झाला.
सूत्रसंचालन प्रवीण अमृतकार यांनी केले. रंगगंध गीत सायली संन्यासी, शुभांगी संन्यासी यांनी सादर केले. नटराज पूजन जळगावचे डॉ.प्रदीप जोशी, प्रा. सीमा जोशी यांच्या हस्ते झाले. सुप्रसिद्ध रंगकर्मी शुभांगी दामले यांना डॉ. मीनाक्षी करंबेळकर यांनी महाराष्ट्र कल्चर सेंटर, पुणे टीमचे स्वागत केले. मेटल एम्बॉॉसिंग कलाकार जयेश गायकवाड यांनी डॉ.मोहन आगाशे यांना आपली कलाकृती भेट दिली. मध्यंतरात राजश्री शेटे या रंगगंध सभासदांनी पर्यावरण पूरक गणेश मूर्तीबाबत माहिती दिली.
कार्याध्यक्ष प्रकाश कुलकर्णी, प्रमुख कार्यवाह शालीग्राम निकम, कोषाध्यक्ष रवींद्र शिरुडे, राजेंद्र चिमणपुरे, सुजित माळी, अविनाश सोनवणे, डॉ.मंदार करंबेळकर, उमा चव्हाण, सोनल साळुंखे व रंगगंध कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: In the drama 'Learn the doctor,' the audience mesmerized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.