रेल्वे विकासासाठी निवृत्तांनी प्रगल्भ अनुभवाची जोड द्यावी - डीआरएम

By admin | Published: June 17, 2017 01:15 PM2017-06-17T13:15:06+5:302017-06-17T13:15:06+5:30

रेल्वे पेन्शनर्स असोसिएशनच्या वार्षिक सभेत 87 वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या सेवानिवृत्त रेल्वे कर्मचा:यांचा डीआरएम यादव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Drama should provide an inclusive experience for the development of Railways - DRM | रेल्वे विकासासाठी निवृत्तांनी प्रगल्भ अनुभवाची जोड द्यावी - डीआरएम

रेल्वे विकासासाठी निवृत्तांनी प्रगल्भ अनुभवाची जोड द्यावी - डीआरएम

Next

ऑनलाईन लोकमत

भुसावळ , जि. जळगाव, दि. 17 -  रेल्वेतून  सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा:यांच्या गाठीशी दीर्घ  अनुभव आहे. त्यांनी त्याचा रेल्वेच्या विकासासाठी हातभार लावावा, असे आवाहन भुसावळचे डीआरएम आर.के.यादव यांनी शनिवारी केले. रेल्वे पेन्शनर्स असोसिएशनच्या वार्षिक सभेत 87 वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या सेवानिवृत्त रेल्वे कर्मचा:यांचा डीआरएम यादव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.असोसिएशनचे पेट्रन एस. ओ. ब:हाटे अध्यक्षस्थानी होते. आजच्या सत्काराने सेवानिवृत्त वयोवृद्ध कर्मचारी  भारावून गेल्याचे चित्र होते.
सेवानिवृत्तांनी त्यांचा अनुभव रेल्वेच्या कामासाठी वापरल्यास त्याचा चांगला फायदा होईल, असेही यादव यावेळी बोलताना म्हणाले. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रसंगी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे विभागीय अध्यक्ष व्ही.के.समाधिया यांनी मनोगत व्यक्त केले.
पेन्शन प्रकरणांचा निपटारा
वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ.तुषाबा शिंदे यांनी बोलताना सांगितले की, डीआरएम यादव यांच्या सूचनेनुसार सेवानिवृत्तांच्या पेन्शन बाबतची प्रकरणे तातडीने मार्गी लावली जात आहेत. दोन वर्षात 450  प्रकरण होती ती आता 90 राहीली आहेत. ती पंधरा दिवसात पूर्ण होतील. काहीही अडचण असल्यास ती सोडविली जाईल,असे सांगितले.
व्यासपीठावर  बी.एम.नन्नवरे, असोसिएशनचे अध्यक्ष पी.जे.जावळे, व्ही.के.समाधिया, सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे विभागीय सचिव एस. बी. पाटील उपस्थित होते. प्रसंगी अनेक सेवानिवृत्तांनी असोसिएशनला आर्थिक सहकार्य केले. 
असोसिएशनच्या वार्षिक सभेत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली ती अशी-अध्यक्ष पी.जे.जावळे, उपाध्यक्ष बी.एम.नन्नवरे, आर. एल. पाटील, सचिव मंजूर अहमद, कोषाध्यक्ष एन.आर.सरोदे, सहाय्यक सरचिटणीस पी.बी.जावळे.सदस्य एस.आर.पांडे, एस.टी.नाथ,पी. आर. येवले, व्ही. व्ही. राजपाठक, ए. एम. रायसिंघानी, बी.पी.भंडारी, व्ही.पी. चतूर, सी.डी.पाटील, एस.बी.भांबरे, बी.आर.सरोदे,व्ही.ए.जावळे.पेट्रन एस.ओ.ब:हाटे.
रेल्वे कामकाजात सुधारणासाठी सूचना पाठवा
सेवानिवृत्त वयोवृद्ध रेल्वे कर्मचा:यांचा सन्मान करताना रेल्वे प्रशासनाला अतीव आनंद होत आहे,अशी भावना डीआरएम आर.के.यादव यांनी व्यक्त केली. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की, अनुभवी कर्मचा:यांचा मला गौरव करता आला.सेवानिवृत्त कर्मचा:यांबाबत रेल्वे प्रशासनाला आदर आहे,असेही यादव म्हणाले.सेवानिवृत्तांची कोणतीही समस्या असली तरी ती तातडीने सोडविण्यात येईल विशेष करुन पेन्शन बाबत तातडीने निर्णय घेण्यात येईल.आरोग्याचे प्रश्नही सोडविण्यात येतील. प्रशासनाला सेवानिवृत्तांना अधिक सुविधा देण्यावर भर राहील.सेवानिवृत्तांनी  रेल्वेच्या कामकाजात  सुधारणा करण्याबाबत सूचना कराव्या असेही आवाहन त्यांनी केले.
 

Web Title: Drama should provide an inclusive experience for the development of Railways - DRM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.