पाणी फाउंडेशन सुरू करताना पाहिलेले स्वप्न जवखेड्यात पूर्ण - आमिर खान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 01:06 PM2018-05-15T13:06:56+5:302018-05-15T13:06:56+5:30
ग्रामस्थांशी साधला संवाद
आॅनलाइन लोकमत
अमळनेर, जि. जळगाव, दि. १५ - मन संधारण झाले तर जलसंधारण व्हायला वेळ लागणार नाही आणि त्यामुळे महाराष्ट्र पाणीदार होऊन दुष्काळमुक्त होईल, असे प्रतिपादन अमिर खान यांनी जवखेडा येथे ग्रामस्थांना संबोधित करताना केले. या गावात नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असे सांगून पाणी फाउंडेशन सुरू केले तेव्हा जे स्वप्न पाहिले होते ते आज या गावात येऊन पूर्ण झाल्याचा अनुभव आल्याचे आमिर खान म्हणाले.
सुरुवातीला त्यांनी मराठीत नमस्कार या गावात येऊन आनंद वाटलो , तुमचा गावच काम छान आहे. स्पर्धेत कोण जिंकेल यापेक्षा गावाने मन जिंकले हे महत्वाचे आहे असेही आमिर खान म्हणाले. गावाची आठवण राहील असे सांगताना ‘याद’ या शब्दाला मराठीत काय म्हणतात असे किरण राव यांना विचारले. येथील रोप वाटिका व ग्रीन हाऊस आवडले, शोष खड्ड्यात प्रत्येक घराचा हिस्सा असून सोबतच गाव कला, शांतता, व संस्कृकतेचे प्रतीक असल्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला.
किरण राव म्हणाल्या की या गावातील शिस्तीतील कामे आणि प्रत्येक कामाची वेगळी समिती कुठेच पहिली नाही. यालाच लोकचळवळ म्हणतात जवखेडा गावाची महिला शक्ती मजबूत आहे, या गावाला सलाम, असेही त्या शेवटी म्हणाल्या.
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनीही या गावात नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असे सांगून पाणी फाउंडेशन स्पर्धेत पाहिले येईल, असा विश्वास व्यक्त केला.
अमिरखान व किरण राव यांनी संयुक्तरित्या लगान चित्रपटाचे ‘आजारे... आजारे ...भले कीतने भी लम्बे रस्ते हो...इस धरतीका है राजा जाण ले तू’ हे गीत सादर केले . सूत्रसंचालन मयूर पाटील व सुनील पाटील यांनी केले
तत्पूर्वी अमिरखान यांनी मयूर पाटील, पूजा पाटील, संदीप पाटील, डॉ. दिनेश पाटील यांच्याशी चर्चा करून कामाचे स्वरूप व नियोजनाची माहिती घेतली. ो