रावेर परिसरात पाच फूट अंतरावर ड्रिपर नळ्यांची होतेय जाणीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 04:58 PM2018-11-16T16:58:42+5:302018-11-16T16:59:32+5:30
केºहाळे, ता.रावेर : मूळातच अत्यल्प झालेला पावसाळा, नदीनाले दुधडी वाहून निघणार असल्याचे स्वप्नभंग झाले. त्यामुळे जमिनीतील पाणी पातळीचा स्तर गत वर्षापेक्षाही कमी झालेला आहे. यामुळे शेतकरीवर्ग आतापासून चिंता व्यक्त करीत असून, पुढील पीक वाचविण्यासाठी ताटकळण्याची वेळ येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
केºहाळे, ता.रावेर, जि.जळगाव : मूळातच अत्यल्प झालेला पावसाळा, नदीनाले दुधडी वाहून निघणार असल्याचे स्वप्नभंग झाले. त्यामुळे जमिनीतील पाणी पातळीचा स्तर गत वर्षापेक्षाही कमी झालेला आहे. यामुळे शेतकरीवर्ग आतापासून चिंता व्यक्त करीत असून, पुढील पीक वाचविण्यासाठी ताटकळण्याची वेळ येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
या भागात नैसर्गिक देश असलेला हरित पट्टा भूगर्भातील पाणी व मेहनतीच्या बळावर बागायती पिकांमध्ये केळीसाठी उत्पादनात अग्रेसर राहिलेला आहे. परंतु पावसाच्या अनियमिततेमुळे भूगर्भातील पाण्याअभावी परिसर भकास होण्यास जास्त वेळ लागणार नाही.
पिकांना पाण्याचे नियोजन व अत्यल्प पाणी वापरून जास्तीत-जास्त उत्पादन घेण्याकरिता ईस्त्राईलचे ठिबक सिंचन तंत्रज्ञान संपूर्ण जगभरात वरदान ठरले. सुरूवातीला झालेले ठिबक तंत्रज्ञानाद्वारे वापरण्यात येणाऱ्या नळीमध्ये पिकांना पाणी टाकणारे ड्रिपर पाच फुटांच्या अंतरावर असायचे व ते लाभदायकसुद्धा होते. कारण केळी पिकांची लागवड पाच बाय साडेपाच फूट या अंतरावर असते. त्यामुळे नेमके नळीतून पाणी लागवड केलेल्या खोडाजवळच पडायचे. जमिनीवर इतरत्र पडत नसल्यामुळे नळींमधून येणारा पाण्याचा दाब जास्त मिळायचा. परंतु कालांतराने बदलत्या पिकांसाठी उदा.मका, हरभरा, गहू, ऊस यांच्याकरिता सव्वा ते दीड फूट अंतरावर ड्रिपर असणाºया नळ्या कंपन्यांची बाजारात आणल्या व पाच फुटांवरील ड्रिपर हद्दपार झाले. मात्र केळीसाठी उपयुक्त व पाण्याच्या नियोजनासाठी पाच फुटावरील ड्रिपर असलेली नळीच महत्वाची आहे, अशी जाणीव शेतकºयांना होऊ लागली आहे.
कारण पाच फूट अंतराच्यामध्ये सव्वा फूट ड्रिपर नळी असल्यास दोन ड्रिपरांचे वाया जाणारे अतिरिक्त पाणी पिकांएवजी फक्त जमिनीलाच जास्त मिळत असते. त्यामुळे पाण्याचा टंचाईमध्ये केळीसाठी पाच फुट अंतरावरील ड्रिपरच शेतकºयांना काही प्रमाणात तारण्यात यशस्वी ठरेल, असे मत शेतकरी व्यक्त करीत आहे. यंदा येणारा उन्हाळा हिवाळ्यातच पाण्याचा वनवा घेऊन आला आहे. यामुळे उन्हाळ्यातील बागायत तर सोडाच हिवाळ्यातील रब्बी पीकसुद्धा पूर्णपणे हाती येणार नसल्याची भीती व्यक्त होत आहे.