बसची बैलगाडीला मागून धडक चालक व बैलजोडी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 03:53 PM2019-04-05T15:53:49+5:302019-04-05T15:54:06+5:30

बसचालक पसार: पातोंडा-नांद्री गावाजवळचा अपघात

The driver of the bus and the other injured seriously injured | बसची बैलगाडीला मागून धडक चालक व बैलजोडी गंभीर जखमी

बसची बैलगाडीला मागून धडक चालक व बैलजोडी गंभीर जखमी

Next




पातोंडा, ता. अमळनेर: चालत्या बैलगाडीला मागून येणाऱ्या एस.टी. बसने जोरदार धडक दिल्याने बैलगाडी मालक अनिल गंगाराम पाटील यांच्या डोक्याला व कमरेला दुखापत होऊन ते गंभीर जखमी झाले. तसेच बैलगाडी चे दोन्ही बैलही गंभीर जखमी झाले असून बैलगाडीचे नुकसान झाले आहे. हा अपघात ५ रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास झाला. पातोंडा-नांद्री गावाजवळ घडला.
या घटनेबाबत वृत्त असे की, पातोंडा येथील शेतकरी तथा विकास सोसायटीचे संचालक अनिल गंगाराम पाटील हे सकाळी आपल्या शेतातून बैलगाडीने चारा घेऊन घरी परत येत होते. त्याचवेळी रस्त्यात मागून अमळनेरहून नांदेड ता. धरणगाव येथे जाणाऱ्या अमळनेर आगाराच्या अमळनेर- नांदेड (बस क्र. एम. एच.२० डी.८९०८) या भरधाव बसने बैलगाडीला मागून जोरदार धडक दिली. त्यात बैलगाडीची दुसेर मोडली जाऊन एक बैल रस्त्याच्या कडेला तर दुसरा बैल बैलगाडीसह दोन फरलांगच्या अंतरावर फरफटत जाऊन पडला. बैलगाडी हाकलणारे बैलजोडी मालक अनिल गंगाराम पाटील हे जोरदार फेकले गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. यावेळी बस चालक सुनिल भिमराव पाटील घटना स्थळावरून लागलीच पसार झाले. वाहक मात्र े थांबून होते. घटनास्थळी ग्रामस्थांनी मदत करण्यासाठी व बघण्यासाठी गर्दी केली. जखमी अनिल पाटील यांना तत्काळ अमळनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर घटनास्थळीच जखमी दोन्ही बैलांवर उपचार करण्यात आले. यात बसचे किरकोळ नुकसान होऊन. पुढील पत्राचा भागाला होल पडून काचही फुटला आहे.
सदर अपघाताची फिर्याद सुनिल गंगाराम पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला दिली असून बस चालक सुनिल भिमराव पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पातोंडा पोलीस करीत आहेत.

Web Title: The driver of the bus and the other injured seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात