नदीपात्रात ट्रक कोसळून चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 05:59 PM2019-08-12T17:59:58+5:302019-08-12T18:00:41+5:30
वाघोदेची घटना : समोरच्या वाहनाला वाचवताना अपघात
यावल - तालुक्यातील वाघोदे गावाच्या पुलावरून रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुलावरून ट्रक खाली पडल्याने झालेल्या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या चालकाचा मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, दिनांक ११ आॅगस्टच्या मध्यरात्री सुमारे १ ते २ वाजेच्या दरम्यान यावल-चोपडा रस्त्यावरील वाघोदा गावा जवळील पुलावरून यावलकडून चोपड्याकडे सोयाबीनचा भुसा भरून जात असलेला ट्रक क्रमांक जी. जे. -१२- एटी-७५५५ हा पुलाचे कठडे तोडून पुलावरून सुमारे ३० फुट नदीपात्रात कोसळला. यामुळे ट्रकचालक सामत कान्हा कटेरिया ( वय ३७ ) रा. कडकान्हा जिल्हा राजकोट (गुजरात) हा जागीच ठार झाला आहे.
समोरून भरधाव वेगात येणाऱ्या कोबड्यांनी भरलेला मिनीडोर क्रमांक एम.पी.१२- एच-४७० या वाहनास चुकवण्याचा प्रयत्नात हा ट्रक पुलावरून कोसळला. संतोष पिराजी शिंदे रा. रामनगर, खडंवा (मध्यप्रदेश) हा मिनीडोर चालवत होता. घटनेची माहीती मिळताच साकळी दुरक्षेत्र पोलीस चौकीचे हवलदार अशोक जवरे यांनी घटनास्थळी जात वाघोदा ग्रामस्थांच्या मदतीबाहेर मृतदेह बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात मागील १२ तासापासुन पडलेला होता. यासंदर्भात उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान अपघातास कारणीभूत ठरलला मिनीडोर पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.