चालक मोबाईलवर बोलत असल्याने बस पुलावरून कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2017 10:28 AM2017-07-02T10:28:27+5:302017-07-02T10:28:27+5:30
मुक्ताईनगरातील घटनेत 18 प्रवासी जखमी. चार प्रवाशांना जळगावला हलवले
Next
ऑनलाईन लोकमत
मुक्ताईनगर , दि.2 - ब:हाणपूर रोड स्मशानभूमी लगतच्या नाल्यावरील पुलावरून ब:हाणपूर - मुक्ताईनगर एसटी बस पलटी होऊन झालेल्या अपघातात 18 प्रवासी किरकोळ जखमी झाले. यात चार प्रवाशांना जळगावला हलविण्यात आले. ही घटना शनिवारी सायंकाळी 6.16 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, चालक पंकज नारायण पाटील मोबाइलवर बोलत वाहन चालवित असताना, अपघात झाल्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
ब:हाणपूर येथून मुक्ताईनगरकडे येणारी मुक्ताईनगर आगाराची बस एमएच 14-2700 शहरालगत स्मशानभूमी जवळील आसरा नाला पुलावरून खाली कोसळली. या वेळी एसटीत सुमारे 35 प्रवासी असल्याचे सांगण्यात आले. यातील 18 जखमींना मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार करून 14 प्रवाशांना घरी पाठविण्यात आले. मात्र, चार प्रवाशांना पुढील उपचारासाठी जळगावला पाठविण्यात आले. याप्रकरणी ईश्वरलाल देवलाल जैस्वाल यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरार्पयत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
जखमींमध्ये विनोद चावदस सुरवाडे (वय 42, रा.पळासखेडा, ता. बोदवड), सलमाबी मोईनुद्दीन शहा (वय 26, रा. रुंधान, ता. संग्रामपूर), सानिया मोईनुद्दीन शहा (वय 9), मुजाईद शहा मोईनोद्दीन शहा (वय 7), आलिया मोईनोद्दीन शहा (वय 4), शाहीद मोईनुद्दीन शहा (वय 11), मोईनुद्दीन शहा (वय 49), ईश्वरलाल देवलाल जैस्वाल (वय 60, रा. शेलापूर ता. मोताळा), सुलोचना ईश्वरलाल जैस्वाल (वय 40), पंढरी रूपचंद चौरे (वय 46, रा. मलकापूर), देवीदास पुंजाजी इंगळे (वय 45) जळगाव येथे हलविण्यात आलेल्या चार जखमींची नावे कळू शकली नाही. जखमींना बसमधून बाहेर काढण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, सुनील पाटील, पिंटू पाटील, दीपक पवार, स्वप्नील श्रीखंडे, साबीर शेख, भाजपाचे चंद्रकांत भोलाणे यांनी मदत केली.