भरधाव ट्रॅक्टरची मुकटी येथील दांपत्यास धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 05:58 PM2019-01-19T17:58:25+5:302019-01-19T17:58:56+5:30
म्हसवे शिवारात अपघातात महिला गंभीर
पारोळा : मद्यधुंद ट्रॅक्टरचालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नीसह मुलगा व मुलगी जखमी झाले. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्र. सहावर म्हसवे फाट्यानजीक १८ रोजी झाला. ट्रॅक्टर चालक नरेश महादू मराठे (महाडिक) रा. गजानन पळासखेडे, ता, पारोळा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
धुळे जिल्ह्यातील मुकटी येथील शिक्षक ज्ञानेश्वर निंबा सूर्यवंशी (३२), त्यांची पत्नी यशस्वी सूर्यवंशी (२७), मुलगा स्वामी (४), मुलगी स्वाती (७) हे जामनेरहून पारोळामार्गे मुकटी येथे मोटारसायकलने जात होे. त्या वेळी पारोळाकडून येणाºया भरधाव ट्रॅक्टरने (क्र.एम.एच. -१९, बी.जी. ३८६१) मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघाता ज्ञानेश्वर सूर्यवंशी व त्यांची मुलगी स्वाती या दोघांच्या पायाचे हाड तुटले तर यशस्वी सूर्यवंशी व मुलगा स्वामी हे किरकोळ जखमी झाले. जखमींना कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉ. योगेश साळुंखे, डॉ. सुनील पारोचे यांनी प्रथमोपचार करून डॉ. राहुल जैन यांनी जखमींना रुग्णवाहिकेने धुळे येथे हलविले. या प्रकरणी पोलिसांनी ट्रॅक्टर चालक नरेश मराठे यास ताब्यात घेतले आहे.
म्हसवे शिवारात अपघातात महिला गंभीर
पारोळा : अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील सागर भिका पाटील व त्याची आई सुनंदाबाई भिका पाटील (४०), दोघे रा. गजानन पळासखेडे, ता. पारोळा हे माय-लेकं जखमी झाले. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग सहावर म्हसवे शिवारात १८ रोजी झाला.
सागर पाटील व त्यांची आई सुनंदाबाई पाटील हे पारोळ््याकडे येत असताना त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिली. यात सुनंदाबाई या रस्त्यावर कोसळल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्या वेळी पारोळाकडून जळगावकडे जाणारे वकिलांचे स्टेनो अंकुश गाडगीळ यांनी थांबून जखमी महिलेस कुटीर रुग्णालयात दाखल केले. डॉ. योगेश साळुंखे यांनी प्रथमोपचार करून महिलेस धुळे येथे हलविले.