जळगावात रिक्षाला उडविणाऱ्या कार चालकाला बदडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 12:58 PM2018-06-29T12:58:25+5:302018-06-29T13:02:52+5:30
सोनसाखळी लंपास
जळगाव : सुसाट येणाºया कारने महामार्गावर बांभोरी पुलाजवळ रिक्षाला उडविले. त्यानंतर तेथे न थांबता पुन्हा सुसाट वेगाने निघालेल्या या कारचा बांभोरी येथील नागरिकांनी दुचाकीने पाठलाग करुन गोलाणी मार्केटजवळ अडविले. तेथे कारमधून बाहेर काढून चालक राजेंद्र धनराज जैन (वय ५२, रा.दोंडाईचा, ता.शिंदखेडा जि.धुळे) याला नागरिकांनी बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री १०.१५ वाजता गोलाणी मार्केटजवळ घडली.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, राजेंद्र जैन हे गुरुवारी दोंडाईचा येथून मेहुणे सुभाष सांखला यांच्याकडे कारने (क्र.एम.एच.१८ ए.जे.९३३२) जळगावला येत असताना बांभोरीजवळ कारने एका रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर जैन यांनी तेथे न थांबता पुन्हा वेगाने कार शहराकडे आणली. हा प्रकार पाहिल्यानंतर बांभोरी येथील सात ते आठ दुचाकीस्वारांनी कारचा पाठलाग केला. महामार्गावरुन कार कोर्ट चौकमार्गे गोलाणी मार्केट परिसरात पोहताच दुचाकीस्वारांनी कारला घेरले. दरम्यान, कार इतक्या वेगात होती की, रस्त्यावर अनेक वाहनांना कट मारला, सुदैवाने दुसरा अपघात झाला नाही.
जैन यांना कारमधून काढून बेदम मारहाण होत असताना गोलाणी मार्केट परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती. या गर्दीत महेंद्र गणेश पाटील (वय ३०, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) या पावभाजी विक्रेत्याने जैन यांच्या गळ्यातील सोनसाखळी काढून घेतली. भररस्त्यावर मारहाण व वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांनी शहर पोलीस स्टेशनचे प्रितम पाटील व विजयसिंग पाटील यांना घटनेची माहिती दिली. दोघांना घटनास्थळ गाठून जमावाच्या तावडीतून जैन यांना सोडविले व ताब्यात घेतले.
बांभोरीपासून पाठलाग
अंगझडती घेतली असता महेंद्र याच्याजवळ सोनसाखळी आढळून आली. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, बेदरकारपणे वाहन चालविणे व पोलिसाच्या अंगावर कार नेण्याचा प्रयत्न केला म्हणून जैन यांच्याविरुध्द तर महेंद्र याच्यावरही सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. े