भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव राजभाषा अवॉर्डने सम्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 10:29 PM2018-12-12T22:29:19+5:302018-12-12T22:30:42+5:30
हिंदी भाषेच्या प्रचारासाठी केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल मध्य रेल्वे भुसावळ विभागाचे डी.आर.एम. आर.के.यादव यांना नवी दिल्लीत मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात ‘राजभाषा अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.
भुसावळ, जि.जळगाव : हिंदी भाषेच्या प्रचारासाठी केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल भुसावळ विभागाचे डी.आर.एम. आर.के.यादव यांना नवी दिल्लीत मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात ‘राजभाषा अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.
राजभाषेसंदर्भात प्रशंसनिय कार्य केल्याबद्दल अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘आचार्य महावीरप्रसाद चलवैजंती पुरस्कार’ यादव यांना रेल्वे बोर्डाचे कार्मिक सदस्य एस.एन.अग्रवाल यांच्या हस्ते समारंभपूर्वक देण्यात आला. नवी दिल्ली येथील रेल्वे बोर्डात हा कार्यक्रम झाला. रेल्वे बोर्ड कार्यान्वयन समितीतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो.
मध्य रेल्वेला चार पुरस्कार, तर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात डीआरएम आर.के.यादव यांनी हिंदी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी प्रशंसनीय कार्य केल्यामुळे त्यांची दखल घेऊन त्यांना राजभाषा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात त्यांना राजभाषा अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाले.
दिल्लीहून बुधवारी भुसावळ येथे कर्नाटक एक्सप्रेसने आगमन झाल्यानंतर राजभाषा अधिकाºयांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्यासोबत राजभाषेचे एस.आर.वळावे, वाणिज्य विभागाचे जीवन चौधरी उपस्थित होते. हा सन्मान भुसावळ विभागासाठी मोठी उपलब्धी असल्याचे यादव यांनी सांगितले.