थेंब-थेंब पाण्याने माळरानावर जगवली वृक्षस्नेही परिवाराने झाडे

By admin | Published: April 24, 2017 11:59 AM2017-04-24T11:59:10+5:302017-04-24T11:59:10+5:30

वृक्ष स्नेही परिवाराने अमळनेरच्या पश्चिमेकडील एका टेकडीवर तब्बल 130 झाडी जगवली आहे.

Drops-drops water on trees, trees, trees, and even trees | थेंब-थेंब पाण्याने माळरानावर जगवली वृक्षस्नेही परिवाराने झाडे

थेंब-थेंब पाण्याने माळरानावर जगवली वृक्षस्नेही परिवाराने झाडे

Next

अमळनेर,दि. 24 - खडकाळ, माळरान, पाण्याची कमतरता, चढायला रस्ता नाही, अशा परिस्थितीत थेंब-थेंब पाणी टाकून वृक्ष स्नेही परिवाराने अमळनेरच्या पश्चिमेकडील एका टेकडीवर तब्बल 130 झाडी जगवली आहे. तर 350 खड्डे खोदून ते लागवडीसाठी तयार केले आहेत.
शहराच्या पश्चिमेला तीन ते चार किलोमीटर अंतरावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामागे खडकाळ उंचसखल भाग आहे. याठिकाणी चढायला जागा नव्हती. त्यावेळी वृक्षस्नेही मित्र परिवाराचे डॉ. चंद्रकांत पाटील, संदीप पाटील, कमलेश भावसार, पंडीत नाईक यांनी जेसीबी मशीनने रस्ता बनवला. त्यानंतर तेथे झाडे लावण्यासाठी 500 खड्डे खोदले. सर्व खडय़ात माती टाकून जून 2016 मध्ये 150 झाडी लावली. सुरवातील टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या खदानीत साचलेले पाणी वरती नेऊन, त्यांनी झाडांना टाकले. मात्र हळूहळू ते पाणी आटले. म्हणून लोकसहभागातून टेकडीवर कुंड बांधले. नगरपालिकेला विनंती करून, दररोज पाण्याचे टॅँकर त्यात ओतले जाते. कुंडय़ांनी बादल्यांनी 15 ते 20 लिटर पाणी झाडांना दिले जात होते. मात्र उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याची काटकसर करणे गरजेचे आहे, तसेच झाडांचे संरक्षणही तेवढेच महत्वाचे म्हणून पिंज:यांना जुन्या साडय़ांचे आवरण लावले. झाडांच्या मुळाजवळील पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून जमीनीवर ऊसाच्या पानांचा थर अंथरला. रिकाम्या पाण्याच्या बाटल्या मागवून त्याला तळाशी छिद्रे पाडून त्या भरून थेंब-थेंब पाणी टाकून झाडे जगवली. 150 पैकी 130 झाडे टवटवीत आहेत. डॉ. दिनेश पाटील, हेमंत पाटील, अमोलसिंग राजपूत, अशोक सोनवणे, यांनीही परिश्रम घेतले. याठिकाणी वड,चिंच, जांभूळ, औदुंबर, कडुनिंब, कवट आदी झाडे लावण्यात आलेली आहे.

Web Title: Drops-drops water on trees, trees, trees, and even trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.