भुसावळ विभागात दुबार पेरणीचे संकट
By admin | Published: June 22, 2017 04:25 PM2017-06-22T16:25:09+5:302017-06-22T16:25:09+5:30
पेरणीनंतर पावसाचे आगमन लांबल्याने शेतकरी हवालदिल
Next
ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.22 - पेरणीनंतर पावसाचे आगमन लांबल्याने भुसावळ विभागात शेतक:यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आह़े विभागात सुमारे 50 टक्क्यांच्या आत शेतक:यांनी पेरण्या आटोपल्या असल्यातरी पाऊस गायब झाल्याने शेतक:यांमध्ये चिंता निर्माण झाली आह़े
रावेर तालुक्यात कृषी विभागाने खरिपाच्या 52 हजार 368 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी 19 हजार 828 हेक्टर क्षेत्रात एकूण 37.86 टक्के पेरण्या पूर्ण झाल्याचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात आला़ त्यात ज्वारीची 7400 हेक्टर पैकी केवळ 166 हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली तर मक्याचे 2हजार 700 पैकी 129 हेक्टर अर्थात 4.77 टक्के पेरणी झाली़
बोदवड तालुक्यात 29 हजार हेक्टर जमीन पेरणी योग्य असून यावर दरवर्षी 15 हजार हेक्टरवर कापसाची लागवड केली जाते. यंदा 19 जून र्पयतच्या आकडेवारीनुसार अद्याप फक्त 810 हेक्टरवर पेरणी झाली आह़े
यावल तालुक्यात सुमारे 70 टक्क्यांवर पेरण्या आटोपल्या असून पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट आहे तर भुसावळ तालुक्यात वेगळे चित्र नाही़ मुक्ताईनगर तालुक्यात शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून अनेक भागात अद्यापही पेरण्यांना सुरुवात झालेली नाही़