धुळ्यात भाजपा नगरसेवकावर दरोडा, अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 06:08 PM2018-12-24T18:08:56+5:302018-12-24T18:12:26+5:30

महिलेची सोनपोेत लांबविल्याच्या आरोपावरुन भाजपाचे नवनिर्वाचित नगरसेवक अमोल मासुळे यांच्यासह सहा जणांविरुध्द मोहाडी पोलीस ठाण्यात दरोडा व अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Drugs to the BJP corporator in Dhule, the crime of Atrocity | धुळ्यात भाजपा नगरसेवकावर दरोडा, अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा

धुळ्यात भाजपा नगरसेवकावर दरोडा, अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा

Next
ठळक मुद्देमोहाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखलसोन्याची पोत हिसकावल्याचा आरोपमुलाला जातीवाचक शिविगाळ व धक्काबुक्की केली

धुळे : महिलेची सोनपोेत लांबविल्याच्या आरोपावरुन भाजपाचे नवनिर्वाचित नगरसेवक अमोल मासुळे यांच्यासह सहा जणांविरुध्द मोहाडी पोलीस ठाण्यात दरोडा व अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परेगाबाई शिवाजी कापुरे (५०, गरताड ता. धुळे) या महिलेने मोहाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली. रविवार २३ रोजी पहाटे ५ ते ६ वाजेच्या दरम्यान मासुळेसह इतरांनी घरात अनधिकृत प्रवेश केला़ दरवाजाला लाथ मारत दहशत निर्माण केली़ जाधव यांच्याकडे काम करणाऱ्या मुलाला जातीवाचक शिवीगाळ व कापुरे यांना धक्काबुक्की करण्यात आली़ तसेच गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून घेतली़
अचानक घडलेल्या या घटनेमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले़ याप्रकरणी परेगाबाई कापुरे यांच्या फिर्यादीवरुन नगरसेवक अमोल उर्फ बंटी मासुळे, छोटू शेलार, अमोल पुकळे, बंटी पुकळे, अविनाश पुकळे, मनोज पुकळे (सर्व रा़ धुळे) यांच्या विरोधात भादंवि कलम ३९५, ४५२, ३२३, ५०४, ५०६ सह अनुसुचित जाती जमाती कायदा कलमनुसार गुन्हा नोंदविण्यात आला़ उपअधीक्षक सचिन हिरे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत़

Web Title: Drugs to the BJP corporator in Dhule, the crime of Atrocity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.