दारूबंदीसाठी घेतलेली सभा दारुड्यांनीच उधळून लावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 10:18 PM2020-02-17T22:18:41+5:302020-02-17T22:18:45+5:30
पाचोरा : ज्याचे करावे भले, तो म्हणतो माझेच खरे..
पाचोरा : ‘ज्याचे करावे भले, तो म्हणतो माझेच खरे..’ या म्हणीप्रमाणेच तालुक्यातील गाळण बुद्रूक येथे आपल्या पताराजांच्या आरोग्य जपण्यासाठी दारुबंदीची सभा मोठ्या प्रयत्नांनी आयोजित केली खरी. मात्र दारुड्यांनी त्यात उलटसुलट प्रश्न विचारून चर्चेत खोडा घातला. त्यामुळे दारुबंदीसाठीची ही सभा दारुड्यांमुळे अक्षरश: बरखास्त करावी लागली.
तालुक्यातील गाळण बुद्रूक, हनुमानवाडी, विष्णुनगर या गावांमध्ये अवैधरीत्या गावठी दारू मोठ्या प्रमाणात विक्री होते. यासंदर्भात या ,गावांतील महिलांनी दारूबंदीसाठी तीव्र मोहीम हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास येथील नायब तहसीलदार पूनम थोरात व पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे या महिला अधिका?्यांच्या उपस्थितीत गाळण बुद्रूक येथे ग्रामस्थ व महिलांची दारूबंदीसाठी सभा घेण्यात आली. या सभेत दारूबंदी करण्यासंदर्भात तसेच अवैध दारू विक्रेत्यांच्या भावी चरितार्थासाठी कोणत्या व्यवसायाचा पर्याय चांगले राहतील या विषयावर चर्चा सुरू होती. मात्र या चर्चेत दारुड्यांनी उलटसुलट प्रश्न विचारवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारीत सभा उधळून लावली. दारुड्यांनी चांगल्या चाललेल्या चर्चेत खोडा घातल्यामुळे दारूबंदीसाठीची ही सभा बरखास्त करावी लागली. यावेळी जिजा राठोड यांच्यासह तांड्यावरील बहुसंख्य महिला उफस्थित होत्या.