जळगावात प्रवेशपत्राअभावी विद्यार्थी सेट परीक्षेपासून वंचित
By admin | Published: April 16, 2017 06:49 PM2017-04-16T18:49:55+5:302017-04-16T18:49:55+5:30
पुणे विद्यापीठाकडून सहाय्यक प्राध्यापकासाठी रविवारी सेट परीक्षा घेण्यात आली. मात्र परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र अनेक विद्याथ्र्याना उपलब्ध न झाल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले.
Next
जळगाव,दि.16-पुणे विद्यापीठाकडून सहाय्यक प्राध्यापकासाठी रविवारी सेट परीक्षा घेण्यात आली. मात्र परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र अनेक विद्याथ्र्याना उपलब्ध न झाल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले. पुणे विद्यापीठाच्या या भोंगळ कारभारावर काही विद्याथ्र्यानी ‘लोकमत’ शी बोलताना नाराजी व्यक्त केली.
शहरातील 7 केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली. मात्र रविवारी घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी देण्यात येणारे प्रवेशपत्र विद्याथ्र्याना उपलब्ध होवू शकले नाही. प्रवेशपत्र काढण्यासाठी जे संकेतस्थळ विद्यापीठाकडून उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र हे संकेतस्थळ हॅँग झाल्याने विद्याथ्र्याना प्रवेशपत्र काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तर अनेक विद्याथ्र्याना परीक्षेच्या वेळेर्पयत देखील प्रवेशपत्र न मिळाल्याने परीक्षेपासून वंचित रहावे लागले.