पगाराचा तिढा न सुटल्याने ‘काम बंद’ सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 12:47 AM2018-09-04T00:47:16+5:302018-09-04T00:47:41+5:30
बोदवड येथे कर्मचाऱ्यांकडून मुख्याधिकाºयांना निवेदन
बोदवड, जि.जळगाव : पगारवाढीच्या मागणीसाठी १ सप्टेंबरपासून पुकारलेले ‘काम बंद’ आंदोलन सोमवारी तिसºया दिवशीही सुरूच होते तर बजावलेल्या नोटिशीबाबत दुपारी १२ वाजता कर्मचाºयांचे मुकादम मनोज छापरीबंद, जवरी मिलादे, हनुमान सारवान यांनी मुख्याधिकाºयांना निवेदन दिले.
८० रुपये रोज परवडत नाही. आमच्यापेक्षा रोजगार हमी योजनेचे ३०० रुपये रोज बरा, असे निवेदनात म्हटले आहे. सफाई कर्मचारी शंकर चंदनशिव यांचा अपघात झाला. त्यात ते पायाने अपंग झाले असूनसुद्धा त्यांचा पगार थकीत आहे. त्यामुळे त्याचा औषध खर्चही मिळण्यास अडचण येत आहे. किमान वेतन कायद्यानुसार पगार मिळत नाही तोपर्यंत कामावर येणार नसल्याचे सांगितले, तर सफाई कर्मचाºयाचा सेवा ही अत्यावश्यक आहे, असे करणे चुकीचे असल्याचे प्रशासकीय यंत्रणेकडून त्यांना सांगण्यात आले आहे. तिसºया दिवशीही सफाई कर्मचाºयांचा पगरवाढीचा तिढा न सुटल्याने स्वच्छता व आरोग्याची समस्या कायम होती.