जळगावजवळ दोन ट्रकच्या अपघातामुळे महामार्ग सहा तास ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:38 PM2019-03-24T12:38:21+5:302019-03-24T12:44:21+5:30

ओव्हरटेक करताना दोन ट्रक समोरासमोर धडकल्याने राष्टÑीय महामार्ग सहा तास ठप्प झाला तर या अपघातात ट्रक चालक राजू चॉँद शेख (३५, रा.पिंपळगाव बसवंत, जि.नाशिक) हा चालक जखमी झाला. बांभोरी गिरणा नदी पुलाजवळ रविवारी मध्यरात्री एक वाजता हा अपघात झाला. जखमीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Due to the accident of two trucks in Jalgaon, the highway jammed for six hours | जळगावजवळ दोन ट्रकच्या अपघातामुळे महामार्ग सहा तास ठप्प

जळगावजवळ दोन ट्रकच्या अपघातामुळे महामार्ग सहा तास ठप्प

Next
ठळक मुद्दे बांभोरीजवळ मध्यरात्री अपघात   ओव्हरटेक करताना दोन ट्रक एकमेकावर धडकल्या  चालक जखमी

जळगाव : ओव्हरटेक करताना दोन ट्रक समोरासमोर धडकल्याने महामार्ग सहा तास ठप्प झाला तर या अपघातात ट्रक चालक राजू चॉँद शेख (३५, रा.पिंपळगाव बसवंत, जि.नाशिक) हा चालक जखमी झाला. बांभोरी गिरणा नदी पुलाजवळ रविवारी मध्यरात्री एक वाजता हा अपघात झाला. जखमीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, राजू चॉँद शेख हा चालक नशिराबाद येथील कारखान्यातून ट्रकमध्ये (क्र.एम.एच.१५ ई.जी.५२५६) सिमेंट भरुन शनिवारी रात्री साडे बारा वाजता निघाला. एक वाजता बांभोरी पुल ओलांडतांना एका ट्रकला ओव्हरटेक करताना समोरुन येणाºया एका ट्रकला वाचविल्यानंतर दुसºया ट्रकवर राजू याचा ट्रक धडकला. त्यामुळे दोन्ही ट्रक रस्त्यावर आडवे झाले. अपघातात सिमेंटच्या ट्रकच्या कॅबीनचा चुराडा झाला, त्यामुळे चालक राजू याचा एक पाय व एक हात फ्रॅक्चर झाला. याचवेळी दुसरा ट्रकही या ट्रकवर धडकला.यात दोन ट्रकचे नुकसान झाले. दरम्यान, सिमेंटचा ट्रक डी.के.सोमानी यांच्या मालकीचाअसून निफाड येथे सिमेंट घेऊन जात होता. 

अन्य दोन ट्रकचेही नुकसान
सुरतकडून कोलकाता येथे जात असलेला ट्रक (क्र.डब्ल्यू.बी.२३.डी.१८६२), पाळधीकडून जळगावकडे जात असलेला ट्रक (क्र.एमएच.१९.झेड.३३५९) आणि सिमेंटने भरलेला ट्रक (क्र.एमएच.१५.इ.जी.५२५६) या एकमेकांवर धडकल्या. मध्यरात्री ट्रक हटविणे जिकरीचे असल्याने पहाटेच्या सुमारास तीन क्रेन मागवून ट्रक रस्त्याच्याकडेला घेण्यात आले. त्यानंतर कुठे वाहतूक सुरळीत झाली.
वाहतूक म्हसावदमार्गे वळविली
बांभोरीजवळ अपघात झाल्याने दोन्ही बाजुंनी वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. वाहतूक लवकर सुरळीत होण्याचे चिन्हे दिसत नसल्याने पोलिसांनी एरंडोलकडून जाणारे काही वाहने म्हसावद, वावडदा, नेरीमार्गे तर जळगावकडून शिरसोली, वावडदा व म्हसावदमार्गे वाहतूक वळविली होती. सकाळी सात वाजेनंतर वाहतूक पूर्ववत झाली. दरम्यान, या अपघातामुळे नोकरदार व कंपनीत जाणाºया कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. जळगावात परिक्षेला येणाºया विद्यार्थ्यांचेही हाल झाले.

Web Title: Due to the accident of two trucks in Jalgaon, the highway jammed for six hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.