पत्ता विचारण्याचा बहाणा करीत वृद्धेची सोनसाखळी लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 10:02 PM2017-10-14T22:02:41+5:302017-10-14T22:04:31+5:30
दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने नलिनी भागवत चौधरी (वय ६९, रा.मोहन नगर, मोहाडी रोड) यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचा तीन तोळ्याचा सोन्याचा गोफ व ३० हजार रुपये किमतीची दीड तोळ्याची सोन्याचे मणी असलेली माळ असे ९० हजार रुपये किमतीचे दागिने लांबविण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारी दोन वाजता मोहाडी रस्त्यावर घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१४ : दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने नलिनी भागवत चौधरी (वय ६९, रा.मोहन नगर, मोहाडी रोड) यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचा तीन तोळ्याचा सोन्याचा गोफ व ३० हजार रुपये किमतीची दीड तोळ्याची सोन्याचे मणी असलेली माळ असे ९० हजार रुपये किमतीचे दागिने लांबविण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारी दोन वाजता मोहाडी रस्त्यावर घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नलिनी चौधरी या मोहन नगरात एकट्याच राहतात. मुलगा प्रबोध नोकरीनिमित्त मुंबई येथे स्थायिक आहे तर मुलगी कल्पना भुसावळ येथे सासरी तर दुसरी मुलगा अर्चना पुणे येथे राहायला आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता घराशेजारील देशमुख यांच्यासोबत बोलत असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन दोन जण आले. मागे बसलेला एक जण चौधरी यांच्याजवळ चिठ्ठी घेऊन आले, ती व्यक्ती कुठे राहते. अशी विचारणा करीत असताना देशमुख यांनी आम्हाला काय विचारतो, पुढे जा असे सांगून त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला असता त्याने काही क्षणातच चौधरी यांच्या गळ्यातील ९० हजार रुपये किमतीची सोन्याची माळ व गोफ लांबवून पळ काढला.
दुचाकीच्या नंबरप्लेटवर चिखल
दुचाकीवर आलेले दोन्ही चोरटे ३० वयोगटातील आहेत. एकाने पिवळ्या रंगाचा तर दुसºयाने निळ्या रंगाचा शर्ट घातला होता. दुचाकीच्या नंबरप्लेटवर चिखल लागलेला होता. त्यामुळे दुचाकीला क्रमांक होता की नाही ही देखील शंका आहे. दरम्यान, चौधरी यांनी सायंकाळी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेडकॉन्स्टेबल अरुण निकुंभ तपास करीत आहेत.