जळगावत भिंत पाडल्याने रेल्वे स्टेशन रस्त्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:04 PM2017-07-23T12:04:40+5:302017-07-23T12:04:40+5:30

आता गोविंदा रिक्षा स्टॉप ते रेल्वे स्टेशनर्पयत जाण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

Due to the burning walls of the Jalgaon wall, open the road to the railway station road | जळगावत भिंत पाडल्याने रेल्वे स्टेशन रस्त्याचा मार्ग मोकळा

जळगावत भिंत पाडल्याने रेल्वे स्टेशन रस्त्याचा मार्ग मोकळा

Next
लाईन लोकमतजळगाव, दि. 23 - रेल्वे स्थानक परिसरातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून रेल्वे स्थानकानजीकची भिंत पाडण्यासंदर्भात सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर शनिवारी यश मिळाले. अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत दुपारी ही भिंत जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे आता गोविंदा रिक्षा स्टॉप ते रेल्वे स्टेशनर्पयत जाण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या संदर्भात ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. रेल्वे स्थानकाच्या आवारातील पार्किगजवळील आणि खान्देश सेंट्रल मॉलच्या हद्दीत असलेली भिंत तोडून हा रस्ता मोकळा करण्याचा विषय गेले अनेक महिने प्रलंबित होता. या संदर्भात यापूर्वी दोन वेळा जिल्हाधिका:यांनी पाहणीदेखील केली होती. मात्र रेल्वे प्रशासनाकडून मंजुरी मिळत नसल्याने भिंत पाडण्याचे काम बरेच दिवस रखडले होते. यावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी दुपारी खासदार ए. टी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित अधिका:यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीमध्ये सवार्नुमते ही भिंत पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस आमदार सुरेश भोळे, चंदूलाल पटेल, महापौर नितीन लढ्ढा, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर ,भुसावळ मध्य रेल्वे मंडळाचे विभागीय व्यवस्थापक आर. के. यादव, भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाचे सहायक सुरक्षा आयुक्त सुरेश चंद्र, उपविभागीय अधिकारी जलज शर्मा, निवासी उप जिल्हाधिकारी राहुल मुंडके, पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे, महापालिकेचे उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, शहर वाहतूक शाखेचे सतीश भामरे, सहायक निरीक्षक प्रदीप देशमुख, सहायक नगररचनाकार भास्कर भोळे, शहर अभियंता सुनील भोळे आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित यावेळी होते. रेल्वे पोलीस चौकीजवळ नो-पार्किग झोन करण्यात येणार असून त्याठिकाणी प्रवाशांना उतरवून त्यानंतर वाहने ही खान्देश सेंट्रल मॉलच्या खुल्या जागेत पाकिर्ंगच्या ठिकाणी लावण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. खान्देश सेंट्रल मॉलच्या खुल्या जागेत वाहने पार्किंग करण्यासंदर्भात रेल्वे प्रशासन व महानगरपालिका हे खान्देश सेंट्रल मॉलच्या प्रशासनाशी चर्चा करून परवानगी घेणार आहेत. त्यानंतर 24 मीटरचा रस्ता जाण्या-येण्याच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.भिंत तोडून रस्त्याचा वापर सुरू करणे, शहर आणि परिसरातील तीन उड्डाणपुलांचे रखडलेले काम लवकरात लवकर मार्गी लावण्याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत सवार्नुमते घेऊन त्याची लगेच अंमलबजावणी करीत खासदार ए. टी. पाटील आणि जिल्हा प्रशासनाने शनिवारी उपस्थितांना धक्का दिला. सध्या रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी जो मार्ग आहे तेथे मोठय़ा प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. त्यात प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. ही भिंत पाडल्यामुळे गोविंदा रिक्षा स्टॉपपासून सुरू होणारा 24 मीटर रुंदीचा हा रस्ता वापरण्यास खुला झाल्यावर सध्याच्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण, कोंडी आणि अन्य समस्या टळण्यास मदत होणार आहे.भिंत पाडण्यापूर्वी खासदार ए. टी. पाटील यांच्या उपस्थितीत बैठक सुरू झाली त्या वेळी त्यांनी रेल्वे अधिका:यांना काम करण्याबाबत नेमकी काय अडचण आहे? अशी विचारणा करीत अधिकारी ए.सी. मध्ये बसतात, जनता आम्हाला विचारते, खासदार काय करतात ? हे मी स्वत:साठी नव्हे, तर जनतेसाठी करीत आहे, अशी रेल्वेच्या अधिका:यांना तंबी दिली. कोणाशी बोलायचे असेल तर ते सांगा? रेल्वे मंत्र्याशीही बोलतो, आजच काय ते करायचे ते करू असे म्हणत थेट जागेवरच जाण्याचे ठरविले व त्यानंतर लागलीच भिंत पाडण्यात आली.

Web Title: Due to the burning walls of the Jalgaon wall, open the road to the railway station road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.