दहावीच्या निकालात जळगावात मुलींची आघाडी कायम

By Admin | Published: June 13, 2017 05:50 PM2017-06-13T17:50:52+5:302017-06-13T17:50:52+5:30

जिल्ह्याच्या निकालात गेल्या वर्षाच्या तुलनेत दोन टक्कयांनी घट

Due to the Class X results, girls won the lead in Jalgaon | दहावीच्या निकालात जळगावात मुलींची आघाडी कायम

दहावीच्या निकालात जळगावात मुलींची आघाडी कायम

googlenewsNext

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.13 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने 7 मार्च ते 31 मार्च दरम्यान घेण्यात आलेल्या दहावीचा ऑनलाईन निकाल मंगळवारी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला. यंदा जिल्ह्यात 90.71 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, मुलींनी यंदाही आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल 87.78 टक्के लागला आहे. जिल्ह्यातून यंदा 61 हजार 825 विद्याथ्र्यानी परीक्षा दिली होती. त्यापैकी 54 हजार 267 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 
नाशिक विभागात जळगावचा दुसरा क्रमांक
दहावीच्या निकालात नाशिक विभागाचा निकाल 87.76 टक्के लागला आहे. त्यात धुळे जिल्ह्याचा सर्वाधिक 89.79 टक्के  निकाल लागला व हा जिल्हा विभागात अव्वल ठरला आहे. तर जळगाव जिल्ह्याने 87.78 टक्के मिळवून दुसरा क्रमांक पटकावला. नाशिक जिल्ह्याने 87.42 टक्के मिळवून तृतीय तर  नंदूरबार जिल्ह्याचा 86.38 टक्के  निकाल लागला.
 
मुलीच ठरल्या सरस
मुलींनी आपल्या यशाची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. जिल्ह्यातील 90.71 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 85.68 टक्के मुले दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातून 25 हजार 760 मुलीनी परीक्षा दिली. त्यापैकी 23 हजार 366 मुली उत्तीर्ण झाल्या. तर 36 हजार 65 मुले परीक्षेला बसले होते, त्यापैकी 30 हजार 901 मुले ही परीक्षा उत्तीर्ण झाले. तसेच गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्याच्या एकूण  निकालात 2 टक्क्यांनी घट झाली असून, गेल्या वर्षी जिल्ह्याचा एकूण निकाल 89.78 टक्के इतका लागला होता. 
 
23 हजार विद्याथ्र्याना ‘फस्र्ट क्लास’; 50 विद्याथ्र्याना शास्ती
जिल्ह्यातील 23 हजार  157 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले आहेत. 14 हजार 187 विद्यार्थी व्दितीय श्रेणीने तर 1 हजार  749 विद्यार्थी पास श्रेणीने उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणा:या विद्याथ्र्याची संख्या अधिक आहे. तसेच परीक्षेदरम्यान जिल्ह्यातून एकूण 52 गैरप्रकार झाले होते. त्यापैकी 50 विद्याथ्र्याना मंडळ शिक्षासुची नुसार शास्ती करण्यात आली आहे. 

Web Title: Due to the Class X results, girls won the lead in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.