तोंडी परीक्षा बंद झाल्याने दहावीच्या विद्यार्थ्याची गुणांची होणार ‘कोंडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 05:49 PM2019-01-21T17:49:56+5:302019-01-21T17:51:01+5:30

एरवी दहावीची म्हटली की, विद्यार्थ्यांसोबत संपूर्ण कुटुंबदेखील एकप्रकारे तणावतच दिसून येते. मात्र यंदाची परीक्षा ही तर खरोखरच संयमाची परीक्षा घेणारी ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेमधील मूल्यमापनाच्या पद्धतीत यंदापासून बदल केला आहे. चार विषयांची तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापनाचे गुण देणे यंदापासून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे तोंडीच नाहीतर विद्यार्थ्यांची मोठी कोंडीच होणार, असे सध्या दिसून येत आहे.

Due to the closure of the oral examinations, the students will get 10th marks in the 'Kondi' | तोंडी परीक्षा बंद झाल्याने दहावीच्या विद्यार्थ्याची गुणांची होणार ‘कोंडी’

तोंडी परीक्षा बंद झाल्याने दहावीच्या विद्यार्थ्याची गुणांची होणार ‘कोंडी’

Next
ठळक मुद्देनवीन बदलाचा कोणाला फायदा अन् तोटा होणार?यंदा दहावीच्या परीक्षेचा निकाल घटण्याची शक्यता

गोंडगाव, ता भडगाव, जि.जळगाव : एरवी दहावीची म्हटली की, विद्यार्थ्यांसोबत संपूर्ण कुटुंबदेखील एकप्रकारे तणावतच दिसून येते. मात्र यंदाची परीक्षा ही तर खरोखरच संयमाची परीक्षा घेणारी ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेमधील मूल्यमापनाच्या पद्धतीत यंदापासून बदल केला आहे. चार विषयांची तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापनाचे गुण देणे यंदापासून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे तोंडीच नाहीतर विद्यार्थ्यांची मोठी कोंडीच होणार, असे सध्या दिसून येत आहे.
शाळांकडून आतापर्यंत हे गुण सहजपणे देण्यात यायचे. परिणामी विद्यार्थ्यांसमोर या गुणांची भरपाई करण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. यामुळे शिक्षण तज्ज्ञांकडून यंदा निकाल घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गुणांच्या या बदलांमुळे विद्यार्थ्यांवरील तणाव वाढला असून, घरोघरी याची प्रचिती येत आहे. शिक्षण मंडळातर्फे अभ्यासक्रम पुनर्रचनेच्या आधारे विषय रचनेत व गुणप्रणालीत बदल करण्यात आले आहेत. दहावीत विद्यार्थ्यांना तीन भाषा विषय अनिर्वाय आहेत. मागील वर्षापर्यंत या विषयांचे मूल्यमापन हे लेखी तोंडी परीक्षांच्या आधारावर व्हायचे. ८० गुण लेखी परीक्षेचे व २० गुण तोंडी परीक्षेचे राहायचे. यातील तोंडी परीक्षेचे गुण शाळांच्या हाती असायचे व त्यात विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळायचे. मात्र यंदा तोंडी परीक्षा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना १०० गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. भाषा विषयात २० गुणांचा हा फरक भरून काढणे ही कठीण बाब आहे.
दुसरीककडे सामाजिकशास्त्र विषयात १०० पैकी २० गुण प्रकल्पांवर आधारित असायचे. साहजिकच विद्यार्थ्यांना यात चांगले गुण मिळत. मात्र यंदा सामाजिकशास्त्राचे मूल्यमापन पूर्णत: लेखी परीक्षेच्या आधारावर होणार आहे. भाषा व समाजिकशास्त्र हे विषय मिळून विद्यार्थ्यांच्या हक्काचे ८० गुण हातातून गेले आहेत. हे गुण विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेच्या माध्यमातूनच मिळवावे लागणार आहेत. साहजिकच मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल घटणार असल्याचे शिक्षण तज्ज्ञ सांगतात.

यावर्षी कृतीवर आधारित प्रश्नपत्रिका आहेत. शासनाने विद्यार्थ्यांचा स्व:मताचा विचार केला असल्याने विद्यार्थ्यांना भरपूर अभ्यास करावा लागणार आहे. तसेच ही पद्धत योग्य आहे.
-देवीदास महाजन, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जळगाव

पूर्वीच्या मार्क पॅटर्नमुळे हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होत होता. कारण सरसकट विद्यार्थ्यांना तोंडीचे पैकीच्या पैकी गुण दिले जात होते. त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होत होता. तो आता होणार नाही.
-साहेबराव मोरे, मुख्याध्यापक, आ.बं.मुलांचे हायस्कूल, चाळीसगाव

Web Title: Due to the closure of the oral examinations, the students will get 10th marks in the 'Kondi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.