कोरोनामुळे शेतकरी गटांचा नाशवंत शेतीमाल थेट ग्राहकांपर्यत विक्रीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 06:43 PM2020-03-27T18:43:33+5:302020-03-27T18:45:37+5:30
कृषी खात्याकडे नोंदणी केलेल्या शेतकरी गटांचा नाशवंत शेतीमाल शासनाच्या मदतीने थेट ग्राहकांपर्यत विक्रीला नेला जात आहे.
धरणगाव, जि.जळगाव : तालुक्यातील कृषी खात्याकडे नोंदणी केलेल्या शेतकरी गटांचा नाशवंत शेतीमाल शासनाच्या मदतीने थेट ग्राहकांपर्यत विक्रीला नेला जात आहे. यासाठी तहसील कार्यालय व कृषी कार्यालयातर्फे या गटांना वाहन परमिट व इंधन परमिट देण्यात आले आहे. त्यामुळे गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा भाजीपाला व शेतीमाल विक्री करण्याची अडचण आता दूर झाली आहे.
कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन झाल्याने गट शेती करणाºया शेतकºयांचा शेतीमाल बाहेरगावी विक्री करण्यास अडचण निर्माण झाली होती. या शेती गटांना त्यांचा नाशवंत भाजीपाला खराब होऊ नये म्हणन तालुका कृषी अधिकाºयांनी तहसीलदारांकडे ही समस्या मांडून शासनाच्या सूचनेनुसार वाहन परमिट व इंधन परमिट देण्याची विनंती केली. तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी तातडीने या शेतीगटांना वाहन परमिट व इंधन परमिट दिल्याने थेट ग्राहकांपर्यत शेतकºयांना आता माल घेन जाऊन विक्री करण्यास अडचण राहणार नाही.
या शेतीगटांना वाहन परवाना व इंधन परवाना देवून थेट ग्राहकांना भाजीपाला व शेतमाल विकण्याचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी तहसीलदार नितीनकुमार देवरे, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, नायब तहसिलदार प्रथमेश मोहोळ, मंडळ कृषी अधिकारी कंखरे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक दीपक नागपुरे, आत्मा अध्यक्ष राजेंद्र महाजन आदी उपस्थित होते.