मुडीसह परिसरात दुबार पेरणीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 09:37 PM2019-07-16T21:37:55+5:302019-07-16T21:38:02+5:30
अमळनेर : पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटण्याच्या मार्गावर आहेत. परंतु तालुक्यातील मुडी प्र.डा.परिसरात पावसाअभावी पिके सुकून जात असल्याचे ...
अमळनेर : पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटण्याच्या मार्गावर आहेत. परंतु तालुक्यातील मुडी प्र.डा.परिसरात पावसाअभावी पिके सुकून जात असल्याचे चित्र आहे.
पावसाळा सुरू होण्याला दोन महिने होत आहेत. तरीही मुडी परिसरात दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे नदी-नाले कोरडे पडले आहेत. विहिरींनीही तळथ गाठला आहे. अकूणच सध्याची परिसरातील स्थिती चिंताजनक आहे.
काही शेतकऱ्यांनी मे महिन्यात कपाशीची लागवड केली होती. नद्यांचे पात्र आटल्यामुळे कापूसही सुकण्याच्या मार्गावर आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास पशुधनास चाºयाचा प्रश्न अधिक गंभीर बनण्याची शक्यता आहे. चाºयाचे संकट उभे राहिले आहे. हातचा सर्व पैसा जमीनीत टाकला. हाताशी रुपयाही उरला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जगावे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. मुडी परिसरातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.