रोगामुळे केळी उपटून फेकणे सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 16:42 IST2020-09-19T16:41:04+5:302020-09-19T16:42:13+5:30
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना आता सीएमव्ही कुकुंबर व्हायरसने पछाडले आहे.

रोगामुळे केळी उपटून फेकणे सुरूच
मतीन शेख
मुक्ताईनगर : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना आता सीएमव्ही कुकुंबर व्हायरसने पछाडले आहे. तालुक्यातील सुकळी, उचंदा आणि परिसरातील केळी रोपावर आलेल्या कुकुंबर व्हायरसमुळे शेतकऱ्यांनी केळी रोप उखडून फेकावे लागत असल्याने केळी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात आला आहे.
सुकळी, उचंदा, दुई, शेमळदे, मेंढोळदे, पंचाने तसेच खामखेडा या परिसरातील शेकडो एकर क्षेत्रफळावर लावलेल्या केळी पिकाची कापणी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे झाली नाही. जे बाग कापले गेले त्यांना भाव मिळाला नाही. यामुळे शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
अशात आता केळी पिकावर आलेल्या सीएमव्ही कुकुंबर व्हायरसमुळे केळीची नवीन लागवड करण्यात आलेली रोपे बाधित झाल्याने शेतकºयांवर पुन्हा आर्थिक संकट आले आहे. या परिसरातील केळी उत्पादक शेतकºयांनी अक्षरश: त्यांच्या शेतात लावलेले १०-१० एकर क्षेत्रावरील केळीची रोपे उपटून फेकले आहे. यामुळे शेतकरी पुन्हा हवालदिल झालेला आहे. याकडे शासनाने त्वरित लक्ष पुरवावे व आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.
शेमळदे येथील शेतकरी देवीदास बन्सी पाटील, सुधाकर पाटील यांच्यासह अनेक शेतकºयांनी लाखो रुपयाचे खासगी कंपनीकडून केळी रोप घेतले होते आज सीएम व्ही कुकुंबर व्हायरसमुळे उठून फेकावे लागत आहे. यामुळे शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.