दुष्काळी पाहणी समिती जळगाव जिल्ह्यात असतानाच कर्ज बाजारी शेतकऱ्याने घेतले विष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:29 PM2018-12-07T12:29:24+5:302018-12-07T12:30:50+5:30
जळगाव : डोक्यावर कर्जाचा डोंगर व शेतीतून पुरेसे उत्पन्न निघत नसल्याने नैराश्य ओढावलेल्या प्रमोद पुंडलिक साळुंखे (४०, रा. शेलवड, ...
जळगाव : डोक्यावर कर्जाचा डोंगर व शेतीतून पुरेसे उत्पन्न निघत नसल्याने नैराश्य ओढावलेल्या प्रमोद पुंडलिक साळुंखे (४०, रा. शेलवड, ता. बोदवड) या कर्जबाजारी शेतकºयाने विष प्राशन करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेली केंद्रीय पाहणी समिती जिल्ह्यात असतानाच ही घटना घडल्याने यावरूनच जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता लक्षात येते.
प्रमोद साळुंखे यांची शेलवड येथे ८ एकर शेती असून त्यात त्यांनी या वर्षी मका लावला होता. त्याची काढणीदेखील झाली. मात्र पुरेसे उत्पन्न आलेली नाही. गेल्या काही वर्षांपासून असाच प्रकार घडत असल्याने साळुंखे यांच्यावर कर्जाचा बोझा वाढत गेला. हे कर्ज कसे फिटणार या विवंचनेत ते सतत राहत असून गुरुवारी दुपारी शेतात गेले व तेथे त्यांनी विष प्राशन केले, अशी माहिती साळुंखे यांच्या नातेवाईकांनी जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ‘लोकमत’शी बोलताना दिली.
शेतात ते खाली पडलेले दिसल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांना तेथे धाव घेत साळुंखे यांना बोदवड ग्रामीण रुग्णालयात हलविले. तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले.
बाभूळवाडीच्या तरुणानेही घेतले विष
दुसºया एका घटनेत धुळे जिल्ह्यातील बाभूळवाडी येथील समाधान राजेंद्र पाटील (३०) या तरुणानेदेखील विष प्राशन केले. त्यालादेखील जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले.