बनावट निविदा प्रकरणी भुसावळच्या कंत्राटदारास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 11:52 AM2018-10-26T11:52:19+5:302018-10-26T11:53:56+5:30

सार्वजनिक बांधकाम विभागातील अनागोंदी

Due to fake tender, Bhusaval contractor arrested | बनावट निविदा प्रकरणी भुसावळच्या कंत्राटदारास अटक

बनावट निविदा प्रकरणी भुसावळच्या कंत्राटदारास अटक

Next
ठळक मुद्देअधिकारी व कर्मचा-यांना वगळलेजिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती तक्रार

जळगाव : हरिद्वार येथील सेहगल स्टील इंडस्ट्रीज यांच्या नावाने खोटे बील व बनावट ईमेल सादर करुन पुलाच्या बांधकामाची निविदा मिळविल्याप्रकरणी कंत्राटदार विनय सोनू बढे (रा.भुसावळ) याच्याविरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून गुरुवारी बढे यास अटक करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील अनागोंदी उघड झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राष्टÑीय महामार्ग ६ वरील तळवेल फाटा ते जुनोने दिगर, आमदगाव- रुईखेडा रस्त्यात लहान पुलाचे बांधकाम करण्यासाठी पाच कंत्राटदारांनी ८ आॅगस्ट २०१६ रोजीच्या पत्रानुसार निविदा भरल्या होत्या. त्यापैकी विनय सोनु बढे (रा.भुसावळ) यांना अंदाजपत्रकीय दरापेक्षा १६ टक्के कमी दराने निविदा मिळाली होती. ५४ लाख ९३ हजार ४७ रुपयांची ही निविदा होती.
जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती तक्रार
सचिन प्रल्हाद भोंबे (रा.मुक्ताईनगर) यांनी अनुप्रेम कन्स्ट्रक्शन (जळगाव) व विजय बढे (भुसावळ) यांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याची तक्रार १५ सप्टेंबर २०१६ रोजी केली होती.
काम पूर्ण झाल्यानंतर विजयकुमार नामदेव काकडे यांनीही जिल्हाधिकाºयांकडे अशीच तक्रार केली होती. या कामाची निविदा बढे यांना मिळाली असल्याने बांधकाम विभागाने तक्रारीची पडताळणी व चौकशी केली असता बढे यांचे बील, इमेल आयडी बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन कार्यकारी अभियंता (उत्तर विभाग) रवींद्र शिवनारायणसिंग परदेशी यांनी बुधवारी रात्री जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाधिकारी उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी व महेंद्र बागुल यांनी बढे यांना भुसावळहून अटक केली.
फिर्यादीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या />अधिकारी व कर्मचा-यांना वगळले
याप्रकरणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीने सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिकचे मुख्य अभियंता यांनाही पत्र पाठवून चौकशी करण्यास सांगितले होते. मुख्य अभियंता यांनी दक्षता व गुणनियंत्रण मंडळ, नाशिकचे अधीक्षक अभियंता एस.एस. पाटील यांना चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार पाटील यांनी चौकशी करून अहवाल दिला होता. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी तक्रारीची गांभीर्यपूर्वक पडताळणी न करता ७३ पैकी ९ कामे बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रदान केल्याचा ठपका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षता व गुणनियंत्रण मंडळाचे अधीक्षक अभियंता तथा चौकशी अधिकाºयांनी ठेवला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडून मात्र कारवाई ऐवजी दोषींना पाठीशी घालण्याचे प्रयत्न सुरूवातीपासूनच सुरू आहेत. जिल्हाधिकाºयांनी फौजदारी करण्याचे आदेश दिल्यानंतर याप्रकरणी शासनाकडे अहवाल पाठविला असून शासनच कुणावर कारवाई करायची ते सुचवेल, असे सांगितले होते. आता या प्रकरणात पोलिसांत दिलेल्या फिर्यादीतही केवळ मक्तेदाराविरूद्धच तक्रार देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांच्या मक्तेदाराशी असलेल्या संगनमतामुळेच त्याला त्यांच्या कार्यालयातील संगणकावरून बनावट ई-मेल तयार करणे शक्य झाले आहे.
काय आहे घोळ?
निविदेत पात्र ठरलेल्या अनुप्रेम कन्स्ट्रक्शन्स, जळगाव, भालचंद्र तळेले व विनय सोनू बढे हे पात्र ठरले. त्या पैकी विनय बढे यांनी निविदेसोबत सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये सेहगल स्टील इंडस्ट्रीज, हरिद्वार, उत्तरप्रदेश यांच्याकडून १९ फेब्रुवारी २०१६ रोजी ५ हजार लिटरचे वॉटर टँकर, स्लम्प कोन, क्यूब मोल्ड, चाळण्या, मेकॅनिकल अ‍ॅसफाल्ट स्पेअर युनिट खरेदी केल्याचे तीन ईनव्हाईसेस जोडले होते. ते खोटे असल्याची तक्रार असल्याने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग (उत्तर) यांनी १८ नोव्हेंबर २०१६ रोजीच्या पत्रान्वये सेहगल स्टील इंडस्ट्रीज, हरिद्वार यांना रजिस्टर पोस्टाने कळविले. त्याला सहेगल स्टिल इंडस्ट्रीजने ३० नोव्हेंबर २०१६ रोजी कार्यकारी अभियंता उत्तर विभाग जळगाव यांना सदरचे इनव्हाईसेस आम्ही दिलेले नाहीत, असे ई-मेलने कळविले.
मात्र तो ई-मेल दडवून ठेवत कार्यकारी अभियंता (उत्तर विभाग) यांच्या कार्यालयातच संगणकावर सेहगल स्टील इंडस्ट्रीज या कंपनीच्या नावाने बनावट ई-मेल अकाऊंट तयार करून इनव्हाईस दिले असल्याचा बनावट मेल कार्यकारी अभियंता यांना पाठविण्यात आला.
तसेच मे. अनुप्रेम कन्स्ट्रक्शन्स यांनीही अ‍ॅग्रीमेंटधारक उज्ज्वलकुमार नामदेव बोरसे यांच्या नावाचे सेहगल स्टील इंडस्ट्रीजचेच १९ फेब्रुवारी रोजीचेच दोन ईनव्हाईस जोडले असल्याने त्यावरही कारवाई होण्याची शिफारस चौकशी अधिकारी दाभाडे यांनी केली होती.

Web Title: Due to fake tender, Bhusaval contractor arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.