सोयगाव येथे दुष्काळीस्थितीमुळे मत्स्य व्यवसाय अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 10:04 PM2018-10-16T22:04:11+5:302018-10-16T22:06:38+5:30

केवळ पाण्यावर अवलंबून असलेला मत्स्यव्यवसाय सलग दुसºया वर्षी संकटात सापडल्यामुळे मासेमारी करून उदरनिर्वाह करणाºया अनेक कुटुंबासमोर पोट कसं भरायचं हा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे

Due to famine due to fisheries problem in Soygaon | सोयगाव येथे दुष्काळीस्थितीमुळे मत्स्य व्यवसाय अडचणीत

सोयगाव येथे दुष्काळीस्थितीमुळे मत्स्य व्यवसाय अडचणीत

Next
ठळक मुद्देसोयगाव पंचक्रोशीतील मासेमारी करणाऱ्यांपुढे आर्थिक संकटसोयगाव तालुक्यातील ११ पैकी फक्त चार जलाशयात पाणीनदी-नाले व शेततळे झाले कोरडेठाक

सोयगाव : केवळ पाण्यावर अवलंबून असलेला मत्स्यव्यवसाय सलग दुसºया वर्षी संकटात सापडल्यामुळे मासेमारी करून उदरनिर्वाह करणाºया अनेक कुटुंबासमोर पोट कसं भरायचं हा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे
तालुक्यात यंदा खूपच कमी पाऊस झाल्यामुळे खरीप हंगाम गेला. रब्बीच्या आशा मावळल्या आता फक्त चिंता आहे ती पिण्याच्या पाण्याची. त्यात केवळ पाण्यावर अवलंबून असलेल्या मत्स्य उद्योग यंदा कोरड्या पडत चाललेल्या जलाशयामुळे संकटात सापडला आहे. तालुक्यात ११ जलाशयावर केवळ चार जलाशयात पिण्यासाठी पाणी आहे. नदी-नाले शेततळे कोरडेठाक झाले आहे
विशेष म्हणजे दुष्काळाचे हे दुसरे वर्ष आहे. जूनमध्ये चांगला पाऊस झाला म्हणून मत्स्यव्यवसायीकांनी परप्रांतातून महागडे बियाणे आणत तलावात सोडले. मात्र पावसाने दडी मारल्यामुळे जलाशयातील पाणी हळूहळू कमी होऊ लागले आहे. त्यामुळे जिवंत राहण्यासाठी माशांची तडफड सुरू झाली. वेताळ वाडी बनोटी भागातील तलाव वगळता काही जलाशये कोरडी पडली तर काही मध्ये जेमतेम पाणी आहे.

Web Title: Due to famine due to fisheries problem in Soygaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.