मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलनामुळे केळी वाहतुकीवर मोठा परीणाम
By admin | Published: June 8, 2017 12:55 PM2017-06-08T12:55:07+5:302017-06-08T12:55:07+5:30
उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील शेतक:यांचे आंदोलन सुरू आहे. त्याला देवास आणि इतर भागात हिंसक वळण लागले आहे.
Next
ऑनलाईन लोकमत
सावदा,दि.8 - उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील शेतक:यांचे आंदोलन सुरू आहे. त्याला देवास आणि इतर भागात हिंसक वळण लागले आहे. या आंदोलनाचा परीणाम जिल्ह्यातील केळी वाहतुकीवर झाला आहे.
सावदा व फैजपूर, रावेर व यावल या भागातून रोज 400 ते 500 मालट्रक केळीची वाहतूक होते. मात्र मध्यप्रदेश व उत्तर प्रदेशात सुरु असलेल्या आंदोलनामुळे कमी होऊन 40 ट्रकवर आली आहे. दरम्यान, केळी कापणी सुरू आहे. मात्र वाहतूक होत नसल्याने जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेवर परीणाम झाला आहे. शेतकरी, व्यापारी आणि मजूर यामुळे थांबले आहेत.