फोनी वादळामुळे जळगाव येथे तापमानात दोन दिवसात चार अंशांंनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 12:38 PM2019-05-03T12:38:29+5:302019-05-03T12:39:38+5:30

जळगावकरांना दिलासा

Due to the foil storm, the temperature decreased by four degrees in Jalgaon two days | फोनी वादळामुळे जळगाव येथे तापमानात दोन दिवसात चार अंशांंनी घट

फोनी वादळामुळे जळगाव येथे तापमानात दोन दिवसात चार अंशांंनी घट

Next

जळगाव : पूर्व किनारपट्टीवर धडकलेल्या ‘फोनी’ वादळाचा परिणाम जिल्ह्यातील वातावरणावर झाला असून दोन दिवसात तापमानात ४ अंशाची घट झाली आहे. यामुळे प्रचंड उकाड्याने हैराण असलेल्या जळगावकरांना दिलासा मिळाला आहे.
३० एप्रिल रोजी ४५ अंशावर असलेला पारा गुरुवारी ४१ अंशावर आला होता. तसेच काही अंशी ढगाळ वातावरण असल्यामुळे उष्ण झळा जाणवत नव्हत्या. यासह वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण देखील वाढल्याचे आढळून आले. ‘फोनी’ वादळामुळे पूर्व घाटाकडून ५० किमीपेक्षा जास्त वेगाने वारे वाहत आहेत. दरम्यान, हे वादळ ओडीसा पर्यंत पुढे सरकले तर विदर्भासहीत जिल्ह्यातही पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी दोन दिवस जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. यामुळे तापमानात देखील मोठी घट होवून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तापमानात अजून घट होण्याचा अंदाज वर्तविण्याला आहे.
आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यावर आलेले वादळ जर पुढे सरकेल तर जळगाव जिल्ह्यात पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. अन्यथा वातावरण काही अंशी ढगाळ राहण्याची शक्यता असून तापमानातही थोडी घट होईल.
-शुभांगी भुते, हवामान तज्ज्ञ, कुलाबा वेधशाळा

Web Title: Due to the foil storm, the temperature decreased by four degrees in Jalgaon two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव