मालवाहतूकीमुळे एसटी मालामाल, चालक मात्र कंगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:13 AM2021-05-29T04:13:41+5:302021-05-29T04:13:41+5:30

आर्थिक आर्थिक नुकसान : महामंडळाच्या धोरणाबद्दल चालकांमध्ये नाराजी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे प्रवासी सेवा बंद असल्याने, महामंडळाने ...

Due to freight, ST goods, drivers are poor | मालवाहतूकीमुळे एसटी मालामाल, चालक मात्र कंगाल

मालवाहतूकीमुळे एसटी मालामाल, चालक मात्र कंगाल

Next

आर्थिक आर्थिक नुकसान : महामंडळाच्या धोरणाबद्दल चालकांमध्ये नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनामुळे प्रवासी सेवा बंद असल्याने, महामंडळाने माल वाहतुकीच्या उत्पन्नावर भर दिला आहे. त्यामुळे गेल्या महिन्यांच्या लॉकडाऊन मध्ये मालवाहतूकीतून जळगाव विभागाला तब्बल १८ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. मात्र, एकीकडे मालवाहतुकीतून महामंडळ मालामाल होत असताना, दुसरीकडे बाहेरगावी ट्रक नेल्यानंतर, जो पर्यंत परतीचा माल मिळत नाही, तो पर्यंत या चालकांना चार ते पाच दिवस बाहेरगावी थांबावे लागत असल्याने, त्यांचा वैयक्तिक खर्च वाढला असल्याचे चालकांनी सांगितले. त्यामुळे मालवाहतूकीतून महामंडळ मालामाल आणि चालक मात्र कंगाल होत असल्याची स्थिती आहे.

गेल्या वर्षापासून महामंडळाच्या प्रवासी सेवावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेकदा कर्मचाऱ्यांचे पगार रखडले. यातून बाहेर पडण्यासाठी महामंडळाने मालवाहतुकीची सेवा सुरू केली आहे. सुरुवातीपासून या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात जळगाव विभागाने एक कोटींहुन अधिक उत्पन्न मिळवले आहे. पूर्वी प्रमाणे चालकांना एका दिवसात घराकडे परत येता येत नसून, परतीचा माल मिळाल्यावरच घराकडे येण्याचे महामंडळाने काढले आहेत. त्यामुळे या चालकांना चार दिवस तर कधी आठ दिवसांपर्यंत बाहेरगावी रहावे लागत आहे. बाहेरगावी राहण्याचा ॲडव्हान्स महामंडळातर्फे देण्यात येत असला तरी, दिलेला ॲडव्हान्स पगारातून कपात करण्यात येत असल्यामुळे चालकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.

इन्फो :

कोरोना काळात १८ लाखांची कमाई

- गेल्यावर्षा प्रमाणे यंदाही लॉकडाऊनमध्ये महामंडळाची मालवाहतुक सेवा यशस्वी ठरली आहे. गेल्या महिन्याभरात १८ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.

- महामंडळाकडून जळगाव जिल्ह्यातील नव्हे तर राज्यभरात कुठेही माल पोहचविण्यात येत आहे. त्यामुळे भाड्यापोटी सहजच एक लाखांच्या घरात उत्पन्न येत आहे

-या ट्रकद्वारे विविध व्यापारी व उद्योजकांचा कच्चा माल, सरकारी रेशनिंग माल, बी-बियाणे, किराणा माल आदी मालाची वाहतूक करून, त्यातून भरघोस उत्पन्न मिळत आहे.

इन्फो :

परतीचा माल मिळेपर्यंत बाहेरगावीच मुक्काम

- पूर्वी संबंधित गावाला माल पोहचविल्यानंतर, चालकांना लागलीच ट्रक घेऊन पुन्हा जळगावकडे येता येत होते. मात्र, आता नव्या धोरणानुसार चालकांना परतीचा माल मिळल्यावरच परत येता येत आहे.

- एखाद्या गावाला गेल्यावर त्या ठिकाणाहुन परतीचा माल नसेल तर कधी-कधी पुढे आजून संबंधित आगारातर्फे बाहेरगावी पाठवले जाते. अन्यथा त्याच आगारात माल मिळेपर्यंत दोन दिवस तर कधी चार दिवस मुक्काम करावा लागत आहे. यामुळे चालकांचा बाहेरगावी राहण्याचा खर्च वाढून, त्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.

इन्फो :

ॲडव्हान्स मिळतो, पण पगारातून होतो कट

- ट्रकवर चालक असलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेरगावी जातांना खर्चासाठी ॲडव्हान्स दिला जातो. मात्र, दिलेला ॲडव्हान्स पगारातून कपात केला जातो.

- संबंधित चालकाच्या मागणीनुसारच ॲडव्हान्स दिला जातो, अन्यथा दिला जात नाही.

- मालवाहतुकीच्या अंतरानुसार चालकांना ॲडव्हान्स दिला जातो. साधारणतः पाचशे रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत ही रक्कम दिली जाते.

- बाहेरगावी आगारातच राहण्याची व्यवस्था असली तरी, जेवणाची व्यवस्था चालकांना स्वतः करावी लागते. त्यात बाहेरगावी राहायचे म्हटल्यावर इतर खर्च वाढत असल्याने, दर महिन्याला तीन ते चार हजार कर्मचाऱ्यांनी घेतलेला ॲडव्हान्स पगारातून कपात करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

चालक म्हणतात..

१) पूर्वी माल पोहचवून सायंकाळी घराकडे परत येता येते. मात्र, महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी रिकामा ट्रक न आणता, माल घेऊनच बाहेरगावाहून येण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, लगेचच माल मिळत नसल्याने आम्हाला चार ते पाच दिवस बाहेरगावी रहावे लागते. ऐन कोरोना काळात बाहेरगावी रहावे लागत असल्याने, महामंडळाचा हा निर्णय चुकीचा आहे.

एक चालक

उत्पन्न वाढीसाठी महामंडळाच्या या नियमामुळे कर्मचारी मात्र कंगाल होत आहेत. मात्र, पोटासाठी सर्व त्रास सहन करावा लागतो. स्वतःच्या फायद्यासाठी पुढे-पुढे करणारे कामगार संघटनांचे प्रतिनिधी आता का गप्प आहेत, त्यांनी या धोरणा विरोधात आवाज उठवायला हवा होता.

एक चालक

माल वाहतुकीसाठी बाहेरगावी ट्रक घेऊन गेलेल्या चालकाला दुसऱ्या दिवशी घरी सोडण्याबाबतचा महामंडळाचा नियमच आहे. मात्र, प्रशासकीय पातळीवर व्यवस्थित नियोजन होत नसल्याने, चालकांना बाहेरगावी जास्त मुक्काम करावा लागत आहे. त्यामुळे चालकांचा हा त्रास थांबण्यासाठी महामंडळाच्या महाव्यवस्थापक यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. लवकरच यातून तोडगा निघेल.

हिरेन रेडकर, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कामगार सेना

Web Title: Due to freight, ST goods, drivers are poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.