पेशवेकालीन गणेश मंदिरामुळे भडगावच्या वैभवात भर
By admin | Published: April 13, 2017 02:48 PM2017-04-13T14:48:51+5:302017-04-13T14:48:51+5:30
शनीचौक दरवाजापुढे पेशवेकालीन गणेश मंदिर आहे. नवसाला पावणारा गणपती अशी भाविकांची येथे श्रध्दा आहे.
Next
ऑनलाईन लोकमत विशेष /अशोक परदेशी
भडगाव (जि. जळगाव),दि.13- शनीचौक दरवाजापुढे पेशवेकालीन गणेश मंदिर आहे. नवसाला पावणारा गणपती अशी भाविकांची येथे श्रध्दा आहे. नेहमीच या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते.
1795 साली रघुनाथराव पेशवे नागपूर येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी गिरणा नदीपात्रात सैन्याची छावणी पाठविली होती. गणपती हे पेशव्यांचे दैवत होते. त्यामुळे गावाबाहेर रिध्दी-सिध्दी उजव्या सोंेडेच्या गणपतीचे मंदिर बांधण्यात आले. हे मंदिर नवसाला पावते अशी भाविकांची श्रध्दा आहे. ही गणेश मूर्ती अडीच फूट उंचीची आहे. लगतच रिध्दी सिध्दीच्या दुर्मिळ मूर्ती आहेत. मंदिराचे स्तंभ अखंड दगडाचे आहे. त्यावर नक्षीकाम केले आहे. पेशवे हे उत्तरेस लढाईवर जाता येताना भडगावात मुक्काम करीत असल्याचे जाणकार सांगतात. पेशवे हे गणेशभक्त असल्याने मुक्कामात गणेश पूजेसाठी त्यांनी मंदिराची उभारणी केली. या मंदिरासाठी खर्चाची तजवीज म्हणून त्यांनी शेतजमीन उपलब्ध करुन दिली आहे. मंदिरावर भाविकांची रोज गर्दी होत असते. वर्षभर पूजाअर्चा केली जाते.