आजीच्या वर्षश्राद्धनिमित्त नातवाने दिली विद्यार्थ्यांना २५ हजार रुपयांची एमपीएससीची पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 03:09 PM2019-06-10T15:09:22+5:302019-06-10T15:11:22+5:30

वर्षश्राद्ध म्हटलं की, प्रत्येक व्यक्ती आपल्या मृत नातेवाईकांच्या आठवणीत व सन्मानार्थ विविध प्रकारचे कार्यक्रम व उपक्रम आयोजित करून अन्नदान करत असतात. मात्र नांदवेल, ता.मुक्ताईनगर येथील प्रदीप मुरलीधर पाटील या युवकाने मात्र आपल्या कार्याचा आगळा वेगळा ठसा उमटवत आजीच्या वर्षश्रद्धानिमित्त गावभोजनासह नांदवेल परिसरातील विद्यार्थ्यांना २५ हजार रुपयांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पुस्तके भेट देऊन एक आदर्श पायंडा समाजासमोर ठेवला आहे.

Due to the grand celebration of granddaughter of grandmother, students of 25 books of MPSC books of Rs. 25 thousand | आजीच्या वर्षश्राद्धनिमित्त नातवाने दिली विद्यार्थ्यांना २५ हजार रुपयांची एमपीएससीची पुस्तके

आजीच्या वर्षश्राद्धनिमित्त नातवाने दिली विद्यार्थ्यांना २५ हजार रुपयांची एमपीएससीची पुस्तके

googlenewsNext
ठळक मुद्देनांदवेल येथील प्रदीप पाटील यांचा स्तुत्य उपक्रमकार्याचा ठसा उमटवत केले इतरांना प्रोत्साहितमुक्ताईनगर तालुक्यातील विद्यार्थी घेणार लाभमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पुस्तके भेट देऊन समाजासमोर ठेवला एक आदर्श पायंडा

विनायक वाडेकर
मुक्ताईनगर, जि.जळगाव : वर्षश्राद्ध म्हटलं की, प्रत्येक व्यक्ती आपल्या मृत नातेवाईकांच्या आठवणीत व सन्मानार्थ विविध प्रकारचे कार्यक्रम व उपक्रम आयोजित करून अन्नदान करत असतात. मात्र नांदवेल, ता.मुक्ताईनगर येथील प्रदीप मुरलीधर पाटील या युवकाने मात्र आपल्या कार्याचा आगळा वेगळा ठसा उमटवत आजीच्या वर्षश्रद्धानिमित्त गावभोजनासह नांदवेल परिसरातील विद्यार्थ्यांना २५ हजार रुपयांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पुस्तके भेट देऊन एक आदर्श पायंडा समाजासमोर ठेवला आहे.
तालुक्यातील नांदवेल येथील कै.भागीरथीबाई त्र्यंबक पाटील यांचे वर्षश्राद्ध होते. वर्षश्राद्धनिमित्त कै.भागीरथीबाई यांची पाचही मुले शालिग्राम पाटील, लक्ष्मण पाटील, पुंडलिक पाटील, मुरलीधर पाटील व भागवत पाटील यांनी विधिवत पूजनासह ग्रामभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. मात्र कैलासवासी भागीरथीबाई यांचा नातू प्रदीप मुरलीधर पाटील यांच्या मनात मात्र आगळा-वेगळाच विचार होता. प्रदीप पाटील हा खामगाव, जि.बुलढाणा येथे पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. नांदवेलसारख्या गावात राहून, कठीण मेहनत करून एमपीएससीची परीक्षा पास होऊन पोलीस उपविभागीय अधिकारी पदापर्यंत पोहोचलेला आहे. हीच प्रेरणा आपल्या भावी पिढीतील विद्यार्थ्यांना मिळावी म्हणून प्रदीप पाटील यांनी महालखेडा येथील स्वयंअध्ययन करून विविध पोलीस भरतीमध्ये नावलौकिक कमावणाऱ्या महालखेडा, ता.मुक्ताईनगर येथील तरुणांशी संपर्क साधत लोकसेवा आयोगाची पुस्तके देण्याचा मानस त्यांनी विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केला. त्यानुसार त्यांनी आजीच्या वर्षश्राद्धनिमित्त महालखेडा येथील डझनभर तरुणांना बोलावून घेतले. आजीच्या वर्षश्राद्धप्रसंगी विद्यार्थ्यांना २५ हजार रुपये किमतीची विविध विषयांवर आधारित मूल्याधिष्ठित आणि बौद्धिक क्षमतेला चालना देणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पुस्तके प्रदान केली.
विशेष म्हणजे त्यांचे आजी आणि आजोबा स्व.त्र्यंबक पाटील व भागीरथीबाई पाटील हे दोन्ही अशिक्षित होते. मात्र शिक्षणाचे महत्त्व त्यांनी साठ वर्षांपूर्वी जाणले होते व आम्ही अशिक्षित राहिलो म्हणून आमची मुले अशिक्षित राहू नये या उद्देशाने प्रेरित होऊन त्र्यंबक पाटील यांनी आपल्या मुलांना व नातवंडांना शिकवले. आज मुक्ताईनगर तालुक्यात या कुटुंबाकडे अतिशय आदराने पाहिले जाते. एकाच कुटुंबात पोलीस उपायुक्त, पोलीस उपविभागीय अधिकारी, सरकारी वकील, जिल्हा परिषद सदस्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणारे कुटुंबातील सदस्य आहेत. याप्रसंगी पंचक्रोशीतच नव्हे तर जळगाव व बुलढाणा जिल्ह्यातून भरपूर नातेवाईक व नागरिक उपस्थित असताना त्यांच्यासमक्ष विद्यार्थ्यांनी ही पुस्तके प्रदान करण्यात आले.
विद्यार्थ्यांना चालना मिळाली तर ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील एमपीएससी यूपीएससीसारख्या परीक्षेत स्वत:चे नाव कमवू शकतात. आजी-आजोबा अशिक्षित असताना त्यांनी दाखवलेला मार्ग हा माझ्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्याच मार्गावर पुढे जाऊन मी माझ्याच भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन अधिकारी बनावेत या हेतूने प्रेरित होऊन मी विद्यार्थ्यांना ही पुस्तके व आजीच्या वर्षश्राद्धानिमित्त प्रदान केली आहेत.
-प्रदीप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, खामगाव


 

Web Title: Due to the grand celebration of granddaughter of grandmother, students of 25 books of MPSC books of Rs. 25 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.