पाचोरा व भडगाव तालुक्यातील समस्या आमदारांच्या हतबलतेमुळे : माजी आमदार दिलीप वाघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 06:40 PM2018-10-09T18:40:14+5:302018-10-09T18:45:58+5:30
अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीला बोलावले नाही असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर रोष व्यक्त करणारे आमदार किशोर पाटील हे हतबल आहेत. त्यामुळेच मतदार संघाचे प्रचंड नुकसान होत असल्याची खंत माजी आमदार दिलीप वाघ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
पाचोरा - अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीला बोलावले नाही असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर रोष व्यक्त करणारे आमदार किशोर पाटील हे हतबल आहेत. त्यामुळेच मतदार संघाचे प्रचंड नुकसान होत असल्याची खंत माजी आमदार दिलीप वाघ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
मतदार संघाच्या बोंड आळी, दुष्काळ, बलून बंधारा, शेतकरी कर्जमाफी या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री अधिकाºयांच्या आढावा बैठकीला लोकप्रतिनिधींना निमंत्रित करो अथवा नको जनतेचे प्रतिनिधी या नात्याने आढावा बैठकीच्या दारावर आमदार पाटील यांनी ठिय्या का मांडला नाही ? असा सवाल त्यांनी केला.
साध्या साहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदलीसाठी ठिय्या आंदोलन करणारे आमदार मतदार संघाच्या ज्वलंत प्रश्नांसाठी निमंत्रणाची वाट पाहतात. मतदारसंघाचे प्रश्न आणि अडचणींना वाºयावर सोडतात ही बाब पाचोरा-भडगाव मतदारसंघातील जनतेसाठी दु:खदायक असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी पक्षाच्या सरकारच्या काळातील बंधाºयांच्या सर्व तांत्रिक मान्यताच्या कामाचा उल्लेख करणारे आमदार मतदार संघात एकही मोठे काम करू शकले नाही. मतदार संघातील शेतकरी आणि सामान्य जनता त्रस्त असून आमदार हतबल असल्याचे चित्र आहे. ते जिल्हा बँकेत उपाध्यक्ष आहेत तर दूध संघात संचालक आहेत. या सत्तेतल्या भागीदारीच्या कारणाने आमदार किशोर पाटील यांचा आवाज कमी झाल्याची शंका त्यांनी व्यक्त केली.
यावेळी नगरपालिकेतील गटनेते संजय वाघ, जिल्हा उपाध्यक्ष आणि नगरसेवक रणजित पाटील, शहराध्यक्ष सतीश चौधरी, शशिकांत चंदिले, अजहर खान आदी उपस्थित होते.