निंदणीच्या खुरपीतून पीकांच्या वाढीला गुण देणारी विधवा माता देतेयं लेकीला जिल्हाधिकारी होण्याचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:41 AM2019-03-08T00:41:09+5:302019-03-08T00:41:48+5:30

इयत्ता दहावीत ९५.६० टक्के गुण

Due to the increase of crop from widow weeds, the widow and mother giving birth to the talent | निंदणीच्या खुरपीतून पीकांच्या वाढीला गुण देणारी विधवा माता देतेयं लेकीला जिल्हाधिकारी होण्याचे बळ

निंदणीच्या खुरपीतून पीकांच्या वाढीला गुण देणारी विधवा माता देतेयं लेकीला जिल्हाधिकारी होण्याचे बळ

Next

किरण चौधरी
रावेर - मालकाकडे चुलीपासून ते उद्योग व्यवसायापर्यंत इमाने इतबारे काम करणाऱ्या पतीवर क्रुर काळाने घाला घातल्याने वयाच्या पंचवीसीतचं येथील हेमलता महाजन यांच्यावर वैधव्याचा डोंगर कोसळला. संसारवेलीवरील दुसरीत शिकणारी कांचन व तान्हुल्या कुणाल या दोन्ही फुलांना घरी कोणतीही शेतीबाळी नसतांना केवळ शेतमजूरीवर फुलवले. कांचन हिला वाघीणीचे दूध पाजण्यासाठी अर्थात शिक्षणासाठी ऊन, वारा वा पाऊस याची तमा न बाळगता रक्ताचं पाणी करून काळ्या मातीतील पीकाला निंदणीच्या खुरपीतून गुण देतांनाच, इयत्ता दहावीत ९५.६० टक्के गुण संपादन करून व बारावीच्या सीईटी परीक्षेत १०८ गुण मिळवून शहरातून पहिली आलेल्या कु कांचन हिच्या जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्नांना बळ देण्याचे काम करीत असल्याने महिला दिनानिमित्त त्यांच्या कर्तृत्वाला व ध्येय्याला सलाम केला जात आहे.
शहरातील श्री सप्तश्रृंगी नगरातील जयंत विष्णू महाजन यांचे १२ वी पर्यंत शिक्षण झाले होते.चैतन्य इंजिनीअर वर्क्स या वर्कशॉपसह मालकाच्या घरादारात इमाने इतबारे काम करणारा विश्वासू व प्रामाणिक कर्मचारी म्हणून त्यांनी प्रतिमा निर्माण केली होती. या उदरनिर्वाहाच्या भरवशावरच त्यांचा हेमलता महाजन यांच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर त्यांना मुलगी कांचन व मुलगा कुणाल दोन अपत्य त्यांच्या संसार वेलीवर फुलली. मात्र क्रुर नियतीची दुष्ट नजर जयंत महाजन यांचे १५ वर्षांपूर्वी आजाराने ३० व्या वर्षी निधन झाले होते . पतीच्या नोकरीचा आधारवड कोसळला.घरी शेतजमीन नाही. इवलीशी कांचन दुसऱ्या इयत्तेत व मुलगा कुणाल तान्हुला असतांना हेमलता महाजन यांच्यावर तारूण्यात वैधव्याची कुºहाड कोसळली. चिमुरड्यांचे पालन - पोषण करून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेवून हेमलता यांनी परिस्थितीवर मात करण्यासाठी हातमजुरीसाठी कंबर कसली.

Web Title: Due to the increase of crop from widow weeds, the widow and mother giving birth to the talent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव