डॉक्टर नसल्यामुळे महिलेची रुग्णालयाच्या आवारात व्हॅनमध्येच प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 05:28 PM2019-06-03T17:28:31+5:302019-06-03T17:28:37+5:30
मेहुणबारे येथील प्रकार : अन्य महिलेची नातेवाईकांनी केली प्रस्तुती, कारभाराबाबत संताप
मेहुणबारे ता चाळीसगाव : येथील ग्रामीण रुग्णालयात दोन दिवसांपासून वैद्यकीय अधिकारी नसल्याने रूग्णांचे हाल होत आहेत. आधिकारीच नसल्याने महेुणबारे येथील महिलेला परत पाठविल्याने तिची या रुग्णालयाच्या आवारातच व्हॅनमध्ये प्रस्तुती झाली. तर धामणगाव येथील महिलेचीही डॉक्टरअभावी नातेवाईक महिलांनी स्वत: रुग्णालयात प्रस्तुती करुन घेतली. याबाबत संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
याबाबत वृत्त असे की, मेहुणबारे येथील जुन्या गावातील तरन्नूृम असलम शहा (वय२३) या महिलेला पहाटे पाच वाजता पोटात दुखायला लागले. कुटुंबातील सदस्यांनी या महीलेला गावातील ग्रामीण रुग्णालयात आणले असता रुग्णालयात उपस्थित पारिचारीकाने त्यांना चाळीसगाव येथे रुग्णालयात घेवून जाण्याचे सांगितले.नातेवाईकांनी हात जोडून विनंती केली की आम्हाला येथे दाखल करुन घ्या मात्र चक्क नकार देत रेफर करण्याचा कागद त्यांच्या हातात दिला. मात्र या महीलेची प्रस्तुती व्हॅनमध्येच रुग्णालयाच्या आवारातच झाली. त्यानंतर महीलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याचबरोबर धामणगाव (ता.चाळीसगाव) येथील गंगाबाई अनिल भिल्ल (२५) या महीलेला रविवारी रात्री दोन वाजता ग्रामीण रुग्णालयात प्रस्तुती करीता दाखल करण्यात आले होते. सकाळी सहा वाजता प्रसुती कळा येवु लागल्या मात्र डॉक्टर नसल्याने नातेवाईक घाबरून गेले. तसेच तेथे असलेल्या पारीचारीका जागेवर नसल्याने त्यांनी स्वत: च प्रस्तुती करुन घेतली. बाळाची नाळ तोडण्यासाठी मात्र पारीचारीका आली. या दरम्यान प्रस्तुती होत असताना जर काही जिवाला धोका झाला असता तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्रतिक्रिया......
मी या प्रकरणाची माहिती घेऊन तातडीने आर.एम.ओ.याना तातडीने पाठवतो. या प्रकरणात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
-डॉ.नागोरावजी चव्हाण , सिव्हिल सर्जन जळगाव.