निधी वर्ग न झाल्यामुळे खांब हटविण्याचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 10:10 PM2019-11-25T22:10:29+5:302019-11-25T22:10:43+5:30

जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामासाठी अडथळा ठरणाऱ्या विद्युत खांब हटविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मंजुर केलेला निधी, अद्याप महावितरणकडे वर्ग केलेला ...

 Due to lack of funds, the pillars were removed | निधी वर्ग न झाल्यामुळे खांब हटविण्याचे काम रखडले

निधी वर्ग न झाल्यामुळे खांब हटविण्याचे काम रखडले

Next

जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामासाठी अडथळा ठरणाऱ्या विद्युत खांब हटविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मंजुर केलेला निधी, अद्याप महावितरणकडे वर्ग केलेला नाही. त्यामुळे खांब हटविण्याचे काम रखडले असल्याची माहिती समोर आली असून, उड्डाणपुलाच्या कामाला दिवसेंदिवस विलंब होत आहे.
जीर्ण झालेल्या शिवाजी नगर उड्डाणपुलाचे काम रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात येत असून, गेल्या आठवड्यात मक्तेदारातर्फे पाया भरणीच्या कामालादेखील सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, उड्डाणपुलाच्या इतर कामासाठी पत्र्या हनुमान मंदिरपासून ते टॉवरपर्यंत असलेले महावितरणचे विद्युत खांब या कामासाठी अडथळा ठरत आहेत. खांब हटविण्यासाठी लागणाºया निधी संदर्भात महावितरणने मनपाकडे बोट दाखविले होते. तर मनपाने पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार असल्याने, त्यांनीच यासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी केली. शेवटी जिल्हा प्रशासनाने यासाठी निधी उपलब्ध करुन दिल्यानंतर, महावितरणने या कामासाठी निविदा काढुन, यश इंटरप्राईजेस नावाच्या ठेकेदाराला खांब हटविण्याचा ठेका दिला आहे.
खांब हटविण्यासाठी सव्वा कोटींचा निधी मंजूर आहे. त्यामुळे महावितरणने निविदा प्रक्रिया राबवुन ठेकादाराला हे काम दिले. मात्र, निविदा प्रक्रिया होऊन आठवडा उलटला तरी खांब हटविण्यात आलेले नाही.

Web Title:  Due to lack of funds, the pillars were removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.