मनुष्यबळ नसल्याने सुमारे ६० व्हेंटिलेटर साईडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:17 AM2021-03-23T04:17:14+5:302021-03-23T04:17:14+5:30
नसून शासकीय यंत्रणेतूनही त्यांना परत पाठविले जात आहे. कोरोनाची व त्यानंतर उपचाराची सुविधा नसल्याने दहशत प्रचंड वाढली आहे, अशातच ...
नसून शासकीय यंत्रणेतूनही त्यांना परत पाठविले जात आहे. कोरोनाची व त्यानंतर
उपचाराची सुविधा नसल्याने दहशत प्रचंड वाढली आहे, अशातच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मात्र मनुष्यबळ नसल्याने सुमारे ६० व्हेंटिलेटर बाजूला
पडून असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे.
शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला ११६ पर्यंत विविध पातळ्यांवर
व्हेंटिलेटर उपलब्ध झाले होते. त्यातील काही व्हेंटिलेटर अन्य रुग्णालयांना
देण्यात आले होते. सद्यस्थितीत ९४ व्हेंटिलेटर या ठिकाणी आहेत. यातील ३५
पर्यंत व्हेंटिलेटरवर रुग्ण असल्याची माहिती आहे. मात्र, पूर्ण व्हेंटिलेटर
वापरात असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. अरुण कासोटे यांनी दिली.
तेव्हा ठेवले बाजूला
कोरोनाची रुग्णसंख्या मध्यंतरी कमी झाल्यानंतर हे व्हेंटिलेटर एका खोलीत ठेवण्यात
आले होते. आता मनुष्यबळ आल्यानंतर ते बाहेर काढण्यात येतील, अशी माहिती
सूत्रांकडून समोर आली आहे.
खासगीत जागा नाही
खासगी
कोविड रुग्णालयात बेडच उपलब्ध होत नसल्याने रुग्णांसमोर एक मोठा गंभीर
प्रश्न निर्माण झाला आहे. पैसे देऊनही उपचार मिळत नसल्याने गंभीर
वातावरण निर्माण झाले आहेत. त्यात शासकीय रुग्णालये हात वर करत असल्याने आता
जाणार कुठे, असा प्रश्न रुग्णांसमोर उभा राहत आहे. दरम्यान, रुग्णवाहिकेतूनच
रुग्णांना अनेक रुग्णालये फिरावे लागते आहे.
१ डॉक्टर आले
औरंगाबाद
येथील एक डॉक्टर सोमवारी जळगावात रुजू झाले आहेत. नागपूर येथून ५ डॉक्टर
निघाले असून तेही मंगळवारपर्यंत रुजू होतील, या नंतर टप्प्याटप्प्याने
कक्ष सुरू होतील, असे अधिष्ठाता डॉ. कासोटे यांनी सांगितले.