नाईट लॅडिंगची सुविधेअभावी मुंबईहून जळगावला विमान आलेच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:04 PM2019-09-11T12:04:23+5:302019-09-11T12:04:49+5:30
जळगावला येणाऱ्या प्रवाशांची झाली गैरसोय
जळगाव : कधी पाऊस तर कधी खराब हवामानामुळे विमानसेवेला फटका बसत आहे. जळगाव विमानतळावर नाईट लँडिगची सुविधा नसल्याचा विमानसेवेला फटका बसला. त्यामुळे मंगळवारी मुंबईहून उशिराने निघालेले विमान जळगावला न येता परस्पर अहमदाबादला रवाना झाले असल्याची माहिती ट्रू जेटच्या सुत्रांनी दिली. य मुळे जळगावला येणाºया प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे अहमदाबादहूनच सकाळी एक तास उशिराने जळगावला विमान आले. यानंतर जळगावहून प्रवासी घेऊन, हे विमान दुपारी मुंबईकडे रवाना झाले. त्यानंतर मुंबईहून कोल्हापुरला गेले व पुन्हा कोल्हापूरहून मुंबईला आले. वेळापत्रकानुसार हे विमान १ तास उशिरा धावत होते. या विमानाला मुंबईत सायंकाळ झाली होती.
खराब हवामानाचा विमानसेवेला आठवडाभरात तीनदा फटका
१ सप्टेंबरपासून सुुरु झालेल्या विमानसेवेला आठवडाभरात तीनदा फटका बसला आहे. मुंबईतील पावसामुळे ६ सप्टेंबर रोजी जळगावहून मुंबईला जाणारे विमान अर्धातास उशिराने गेले होते. त्यानंतर ८ रोजी पुन्हा मुंबईतील पावसामुळे जळगावला येणारे विमान रद्द करण्यात आले होते. तर आज नाईट लॅडिंगची सुविधा नसल्यामुळे, मुंबईहून जळगावला विमान आलेच नाही.