आॅनलाईनची सुविधा नसल्याने अनेकांनी सुरु केला थेट व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:58 PM2020-07-25T12:58:57+5:302020-07-25T12:59:58+5:30

वर्दळ सुरू : अनेक मार्केटमध्ये प्रशासनाच्या नियमांना केराची टोपली

Due to lack of online facility, many started direct business | आॅनलाईनची सुविधा नसल्याने अनेकांनी सुरु केला थेट व्यवसाय

आॅनलाईनची सुविधा नसल्याने अनेकांनी सुरु केला थेट व्यवसाय

Next

जळगाव : शहरातील मार्केटमधील दुकाने उघडण्यास मनपाने परवानगी दिली असली तरी मोठ्या मार्केटमधील दुकानांना केवळ आॅनलाईन व घरपोच व्यवसायालाच मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, मोठ्या मार्केटमधील अनेक दुकानदारांकडे आॅनलाईनची व्यवस्था नसल्याने आता थेट व्यवसायालाच सुरुवात केली आहे. आॅनलाईनची व्यवस्था नसल्याने व्यवसाय करणे शक्य नसल्याने आता दुकानदारांनी मनपा प्रशासनाच्या आदेशालाच हरताळ फासला जात आहे.
व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार मनपा व जिल्हा प्रशासनाने शहरातील मोठ्या मार्केटमधील दुकानदारांना दुपारी १२ ते ४ दरम्यान आॅनलाईन पध्दतीने व्यवसाय सुरु करण्याची परवानगी दिली आहे. तर छोट्या मार्केटमधील दुकानदारांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत सम-विषम प्रमाणात दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, सेंट्रल फुले, गोलाणी मार्केटमध्ये आॅनलाईनची सुविधा नसल्याने अनेक दुकानदारांनी आपला व्यवसाय बंदच ठेवला आहे. मात्र, काही दुकानदारांनी आता पथकाच्या नजरा चुकवून व्यवसायाला सुरुवात केली आहे.

मनपाचे पथक पोहचल्यानंतर तातडीने बंद केली जातात दुकाने
फुले मार्केटमध्ये व्यवसाय सुरु झाल्याचे वृत्त कळताच मनपाचे पथक मार्केटमध्ये पोहचले. मात्र, मनपाचे पथक पोहचल्यानंतर दुकानदारांनी आपले दुकाने बंद करत कारवाई टाळली. मनपा कर्मचारी व व्यापारी यांच्यात शुक्रवारी अशाचप्रकारे लपंडावाचा खेळ सुरु होता. दरम्यान, बळीराम पेठ व शनिपेठ भागातील सील केलेल्या गल्लयांमध्ये व्यवसाय करणाºया भाजीपाला विक्रेत्यांवर मनपाकडून कारवाई करून, माल देखील जप्त करण्यात आला. तर नवीपेठ भागातील एक दुकान देखील मनपाकडून सील करण्यात आले.

Web Title: Due to lack of online facility, many started direct business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.