पगाराअभावी विद्यार्थ्याच्या शेतात शिक्षक करतोय मजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 02:02 PM2019-08-12T14:02:10+5:302019-08-12T14:02:56+5:30

विनाअनुदानित शाळांचा प्रश्न गंभीर : पिढी घडविणाऱ्यापुढे संकट

Due to lack of salary, teachers are working in the field | पगाराअभावी विद्यार्थ्याच्या शेतात शिक्षक करतोय मजुरी

पगाराअभावी विद्यार्थ्याच्या शेतात शिक्षक करतोय मजुरी

Next

जळगाव : विनाअनुदानित शाळांना अनुदान नाही, त्यामुळे पगार नाही. पर्यायाने शेंदुर्णी (ता. जामनेर) येथील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकाला विद्यार्थ्याच्या शेतात मजुरीवर काम करावे लागत आहे. उदरनिर्वाहासाठी सकाळी महाविद्यालय व दुपारी शेतात मजुरी करावी लागत असल्याची व्यथा दिनेश आर. पाटील यांनी ‘लोकमत’ कडे मांडली.
शिक्षक पाटील हे एका शेतात फवारणी करीत असल्याचा व्हीडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या शिक्षकाने दिलेली माहिती सर्वांनाच विचार करायला लावणारी आहे.
बेताच्या परिस्थितीत झाले शिक्षक
दिनेश पाटील यांची घरची परिस्थिती बेताचीच.ते लहान असतानाच वडिलांचे निधन झाल्याने सुरूवातीपासूनच त्यांनी कुटुंबियांना हातभार लावला़
अशा स्थितीत त्यांनी एम़ कॉम, बी़ ए़, बीएड, शिक्षण घेऊन ते नेट सेट उत्तीर्ण झाले़ शेंदुर्णी विद्यालयात त्यांना गुणवत्तेनुसार संधी मिळाली़ २००६ पासून ते या ठिकाणी अकाऊंट हा विषय शिकवितात़ गेल्या तेरा वर्षांपासून त्यांना पगारच मिळाला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे़
सकाळी अध्ययन दुपारी मजुरी
घराचे भाडे भरता येत नाही, मुलांच्या शिक्षणााचा प्रश्न गंभीर आहे, रोजचे जीवन जगण्यासाठी लागणार पैसा उभा करावा कसा या विवंचनेतून अखेर सकाळी विद्यालयात विद्यार्थ्यांना शिकवायचे व दुपारी साडे बारानंतर श्ोतात २०० रूपये रोजाने मिळेल ते कामे करायचे अशी रोजची दिनचर्या असल्याचे दिनेश पाटील सांगतात़ अनेक विद्यार्थ्यांच्या शेतातच काम करतात.
मुलांना काय शिकवावे
पगार नसल्याने आम्ही जगायचं कसे, मुलांना शिकवायचे कसे.. आता तर घरमालकाने घराबाहे काढावे, अशी स्थिती उद्भवली असल्याचे दिनेश यांच्या पत्नीने सांगितले.
 

Web Title: Due to lack of salary, teachers are working in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.