सुकी नदीचे पाणी पाटात सोडल्याने शेतकरी-अधिकाऱ्यांत खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:34 AM2018-08-21T00:34:34+5:302018-08-21T00:37:39+5:30
रावेर तालुक्यातील सुकी नदीचे पाणी पाटात सोडल्यामुळे सुकीच्या खोºयात येणाºया गावांमधील संतप्त शेतकºयांनी सोमवारी तहसील कार्यालयात आयोजीत केलेल्या बैठकीत कार्यालयात संताप व्यक्त पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांना धारेवर धरले. त्यामुळे यावेळ एकच खडाजंगी झाली.
रावेर/ चिनावल जि. जळगाव : सुकी नदीचे पाणी
/>पाटात सोडल्याच्या कारणावरून रावेर येथील तहसील कार्यालयात तहसीलदार विजयकुमार ढगे यांच्या दालनामध्ये सोमवारी सकाळी ११ वाजता आयोजीत केलेल्या बैठकीत संतप्त शेतकºयांचे दोन गट आणि अधिकारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यावेळी शेतकºयांना अधिकाºयांकडून लेखी आश्वासन द्यावे लागले.
गारबर्डी धरणाचे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी तापी नदीत न सोडता पाटचारीत सोडल्याने सुकी नदी खोºयातील शेतकºयांची बैठक तहसीलदार विजयकुमार ढगे यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. यावेळी संतप्त शेतकºयांनी पाटबंधारे शाखा अभियंता नेमाडे, शाखा अधिकारी महेश पाटील यांना चांगलेच धारेवर धरले. या प्रश्नावरून तालुक्यातील संबधीत गावांमधील शेतकºयांमध्ये दोन गट पडल्याचे यावेळी निदर्शनास आले.
रोझोदा, कोचुर, चिनावल, सावखेडा कुंभारखेडा, गौरखेडा, उटखेडा विवरे, खिरोदा, मोठे वाघोदा, निंभोरा बुद्रूक, दसनुर या परिसरातील हजारो हेक्टरवरील केळी पिक सुकी नदीच्या पाण्यावर अवलंबून असून मागील वर्षी सुकी नदीला पाणी न आल्यामुळे या गावातील भूगर्भातील जलपातळी खुपच खालावली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. परिणामी सुकी पाणी वाटप सहकारी संस्थेने या भागातून १५ लाख रुपये गोळा करुन पाटबंधारे विभागाला दिल्याने उन्हाळ्यात सुकी नदीला गारबर्डी धरणातून पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे या भागातील भूगर्भातील पाणी पातळी स्थिर होती. तशात धरण भरल्यामुळे शेतकºयांच्या जिवात जीव आला होता. सुकी नदीला पाणी आल्यामुळे हा नैसर्गिक स्त्रोत असल्यामुळे हे पाणी पूर्णपणे तापी नदीला मिळू न देता सुकी नदीचे पाणी पाटचारीत सोडल्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. त्यामुळे ही बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी जि. प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, कोचूर येथील कमलाकर पाटील, वाघोदा येथील पी. एल. महाजन, डी. के. महाजन, चिनावल येथील गोपाल नेमाडे, वाघाडी येथील पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, निंभोरा येथील दिगंबर चौधरी, कडू पाटील, सुनील कोंडे यांच्यासह शेकडो शेतकºयांनी जोपर्यंत शाखा अभियंता लेखी देत नाही तोपर्यंत तहसीलदार यांच्या दालनातून हलणार नाही असा पवित्रा घेतला. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. त्यानंतर शाखा अभियंता महेश पाटील यांनी पाटबंधारे कार्य. अभियंता विश्वे यांच्याशी फोनवरून चर्चा केल्यानंतर शेतकºयांना लेखी आश्वासन देण्यात आले.